Tarun Bharat

ओमिक्रॉनच्या दहशतीखाली बाजार गडगडला

Advertisements

सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, टाटा स्टील, एसबीआय तोटय़ात

वृत्तसंस्था/ मुंबई

सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने सर्वात मोठी घसरण अनुभवली. सेन्सेक्स जवळपास 1100 अंकांनी आणि निफ्टीही 371 अंकांनी कोसळल्याचे पाहायला मिळाले. जागतिक स्तरावर ओमिक्रॉनच्या वाढत्या चिंतेने बाजारात निराशामयी वातावरण राहिले होते. टाटा स्टील, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एसबीआय हे सर्वाधिक घसरणीत राहिले होते.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 1189 अंकांनी घटत 55,822.01 अंकांवर तर सोबत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 371 अंकांनी घसरण नोंदवत 16,614.20 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे प्रत्येकी 2 टक्के इतकी घसरण सोमवारी नोंदवली. जागतिक स्तरावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनच्या बिघडत्या परिस्थितीचे आणि जागतिक बाजारातील कमकुवतपणा भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढवत होता.

सेन्सेक्समध्ये केवळ एचयुएल आणि डॉ. रेड्डिज लॅब्ज यांचे समभाग वधारले होते. कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रवासावर निर्बंध आणि लॉकडाऊन लावला जात आहे. हॉलंडने अलीकडेच लॉकडाऊनची घोषणा केलीय. दरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून गेल्या 40 दिवसात 80 हजार कोटी रुपये काढले आहेत. एकटय़ा डिसेंबरमध्ये 26 हजार कोटी रुपये काढले गेले आहेत. त्याचप्रमाणे दुसरीकडे विविध देशातील केंद्रीय बँकांनीही महागाईबाबत दिलेला इशारा गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण करणारा ठरला आहे. महागाईशी दोन हात करण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात वाढ केलीय. तिकडे अमेरिकेतील फेडरल बँकेनेही महागाईविषयी चिंता व्यक्त केलीय. दिवसभरात सकाळी सेन्सेक्स 494 अंकाच्या घसरणीसह 56,517.26 अंकांवर खुला झाला. पण नंतर काहीशी सुधारणा बाजारात दिसली. एकावेळी तर सेन्सेक्समध्ये 1879 अंकांची जबर घसरण दिसली होती. दरम्यान बीएसईवर बाजार भांडवल 10.47 लाख कोटींनी घसरून 253.56 लाख कोटींवर घसरलं होतं. जागतिक बाजारांमध्ये नकारात्मक कल राहिला. निक्केई 613 अंकांच्या घसरणीसह तर शांघाई कम्पोझीट 31 अंकांनी घसरण नोंदवत होता. हँगसेंग निर्देशांक 340 अंकांनी घसरलेला दिसला.  

Related Stories

दोन दिवसांच्या तेजीला विराम!

Patil_p

रुपे कार्डावरून करा ऑफलाइन व्यवहार

Patil_p

जूनमध्ये इंधनाची 16.29 दशलक्ष टन विक्री

Patil_p

‘जिओ’चा 7 वा करार; ADIA ने केली 5,683 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

अनुपम रसायनचा लवकरच आयपीओ

Patil_p

आयआरसीटीसीचे समभाग 9 टक्क्यांनी वधारले

Patil_p
error: Content is protected !!