Tarun Bharat

ओमिक्रॉनमुळे बेल्जियममध्ये निर्बंधांना विरोध करताना हिंसाचार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

कोरोना संसर्गाने सुमारे दोन वर्षे जगातील मानवी समुदायास पुरते हैराण केले आहे. गेले काही महिने ही भारतासह बहुतांशी देशात कोरोना स्थिती स्थिर होती. यामुळे नागरिकांवरील निर्बंध शिथिल होत होते. मात्र गेल्या काही दिवसापासुन दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिंयंटने डोकेवर काढले. आणि पुन्हा कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने वाढणारी रुग्ण संख्या जगाच्या चींतेत भर घालणारी आहे. यामुळे जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये असणाऱ्या २३ देशांमध्ये मागील दोन दिवसांत कोरोनाच्या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील नऊ पैकी सात राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली असून जगभरामध्ये जवळजवळ ४० देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाउन किंवा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. युरोपबरोबरच पाश्चिमात्य देशांमधील नाताळाच्या उत्सहावर करोनाच्या या नवीन विषाणूचं सावट दिसून येत आहे.

ब्राझीलमधील ३१ डिसेंबरचा उत्सव यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे बेल्जियममध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळणंही कठीण झाल्याचं चित्र आहे. देशामधील प्राथमिक शाळा २० डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर माध्यमिक शाळा दिवसाआड सुरु राहणार आहेत.

फ्रान्समध्ये शुक्रवारी करोनाचे ५१ हजार ६२४ रुग्ण आढळून आले आहेत. येथील करोना रुग्णांच्या संख्येत एका आठवड्यात ६० टक्क्यांनी वाढ झाल्याने सरकारी यंत्रणांची झोप उडालीय. आरोग्य विभागाने सोमवारी म्हणजेच आज तातडीची बैठक बेलावली आहे. यामध्ये करोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा केली जाणार आहे. फ्रान्सने खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत एक कोटी लोकांना बूस्टर डोस दिलाय.

Related Stories

पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १ हजार ४५६ कोटींचा निधी – मंत्री मुश्रीफ

Archana Banage

धोनीच्या ट्विटरवरून ‘ब्लू’ टिक हटवली

Patil_p

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरुच; 14,718 नवे रुग्ण; 355 मृत्यू

Tousif Mujawar

कुपवाडमध्ये तरुणाला काठी, दगडाने बेदम मारहाण : १२ जणांवर गुन्हा  

Abhijeet Khandekar

कृष्णजन्मभूमी प्रकरणास न्यायालयाची अनुमती

Amit Kulkarni

अनिल देशमुखांना ईडी चौकशीला सामोरे जाऊन तुरुंगात जाव लागणार – किरीट सोमय्या

Archana Banage