Tarun Bharat

ओमिक्रॉन जिल्ह्याबाहेर ठेवण्यासाठी प्रशासन अलर्ट

अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 22 डिसेंबर 2021, सकाळी 11.15

● जिल्हा प्रशासनाकडून नियोजनबद्ध आराखडा
● परदेशी नागरिकांच्या ट्रेसिंग, टेस्टिंगवर जोर
● जिल्हा भयमुक्त ठेवण्यासाठी तारेवरची कसरत
● परदेशातून आलेल्या 18 जणांचा शोध लागेना
● जिल्ह्यात नव्याने वाढले 15 कोरोना बाधित

सातारा / प्रतिनिधी :

राज्यात ओमिक्रॉनच्या रूग्णांची संथ गतीने वाढ होत असली तरी सातारा जिल्हा प्रशासन मात्र चांगलेच अलर्ट झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकदा हतबल झालेले प्रशासन ओमिक्रॉन वाढू नये नव्हे तर येऊच नये यासाठी खबरदारी घेताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी परदेशातून आलेल्या प्रत्येकाच्या ट्रेसिंग व टेस्टिंगवर जोर दिला आहे. ओमिक्रॉनला जिल्ह्याबाहेरच रोखण्यासाठी सुरू असलेले नियोजन व धावपळ यात यापुढेही ढिलाई न झाल्यास संभाव्य लाट संभाव्यच राहिल. दरम्यान बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 15 रूग्ण आढळले असून 1923 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.

रूग्णवाढीचा आलेख घसरल्याने भयमुक्त वातावरण

जिल्ह्यात युगांडावरून आलेल्या कोरोना बाधित रूग्णांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाल्यानंतर जिल्ह्यात काहीशी चिंता होती. मात्र तरूण भारतने जिल्हावासियांची चिंता दूर करणारे वृत्त ‘अचूक बातमी’च्या माध्यमातून प्रसिद्ध केले. शिवाय जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने फलटणला परदेशातून आलेल्या रूग्णांना तात्काळ ट्रेस करत त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करून त्यांच्या संपर्कातील इतरांनांही विलिगिकरणात ठेवले. त्यामुळे ओमिक्रॉन ज्या वेगाने पसरतो अशा चर्चा गेल्या महिनाभरापासून होत्या त्याच वेगाने फलटण प्रशासनाने ओमिक्रॉन बाधितांवर उपचार करत त्यांना बरे करण्यावर भर दिला. शिवाय ट्रेसिंग आणि टेस्टिंग करून सर्वांवर लक्ष ठेवल्याने जिल्हा पुन्हा एकदा भयमुक्त झाला.

जसा आराखडा तशीच अंमलबजावणी

राज्यात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत संथ गतीने वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला. मात्र पहिल्या व दुसऱ्या लाटेत झालेला हलगर्जीपणा प्रशासनाने यावेळी मात्र होऊ दिला नाही. कोरोना रूग्णवाढ आटोक्यात ठेवण्याबरोबरच ओमिक्रॉनचा प्रसार होऊन नये यासाठी प्रयत्न केले. तसेच परदेशातून आलेल्यांचे गेल्या पंधरा दिवसांच्या आत ट्रेसिंग करून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचा सपाटा लावला आहे. प्रशासनाने हा जागतेपणा कायम ठेवल्यास जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ होणार नाहीच शिवाय नवा कोणताही व्हेरिएंट शिरकवा करणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हावासियातून व्यक्त होत आहे.

मंगळवारी जिल्ह्यात
नमुने-1923
बाधित-15
मृत्यू-00
मुक्त-21
उपचारार्थ-258

मंगळवारपर्यंत जिल्ह्यात
नमुने-23,53,307
बाधित-2,52,300
मृत्यू-6,488
मुक्त-2,44,827

Related Stories

Kolhapur; दूरशिक्षणच्या पदवी प्रथम वर्षाला युजीसीकडून मान्यता

Abhijeet Khandekar

म्हसवडच्या श्री सिद्धनाथ जोगेश्वरीचे अतिकडक एका पायावरचे “उभ्या नवरात्राचे व्रत” सुरु

Omkar B

Satara : कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

Abhijeet Khandekar

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात पावणे तीन कोटीचे वाटप

Archana Banage

पुरस्कार घ्यायला पुढे जाणारे आता कुठे गेले?

Patil_p

आमदार शिवेंद्रराजेंचा शुभारंभ केव्हा?

Patil_p