Tarun Bharat

ओलेन्सियो सिमोईस व वसंत नाईक यांचा काँग्रेस प्रवेश

काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत कुठ्ठाळीत समारंभ

वार्ताहर /झुआरीनगर

गोंयच्या रापणकारांचो एकवट तसेच गोवा युनायटेड कामगार युनियनचे नेते ओलेन्सियो सिमोईस तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य वसंत (गोपी) नाईक यांनी नकुताच काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. मागच्या विधानसभा निवडणुकीत दोघानीही कुठ्ठाळी व दाबोळीतून आम आदमी पार्टीच्या उमेदवारीवर निवडणुक लढवली होती. हल्लीच त्यांनी आपच्या प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

हा समारंभ कुठ्ठाळीतील पाजेंतार येथील सांलिबरा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व गोवा प्रमुख अखिलेश यादव, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, गोवा युवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, गोवा समिती सचिव जनार्दन भंडारी, दक्षिण गोवा जिल्हा समिती अध्यक्ष जोसेफ डायस, महिला समिती अध्यक्ष बिना नाईक, कुठ्ठाळी काँग्रेस समिती अध्यक्ष पिटर फर्नांडिस, युरी आलेमांव, एलविस गोम्स, राजू काब्राल व इतर पदाध्कारी उपस्थित होते.

भाजपाचे सरकार गोव्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे. या सरकारचा कारभारच पर्यावरणाचा नाश करणारा आहे तसेच आज कुठल्याच गोष्टीवर नियंत्रण राहिलेले नाही अशी टिका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. ओलेन्सियो सिमोईसने यावेळी रापणकारांचे प्रश्न तसेच कामगारांचे प्रश्न उपस्थित करून सरकारवर आरोप केले तसेच त्यांच्या समस्येचे लेखी निवेदन प्रदेशाध्यक्षांना दिले.

Related Stories

हरमलात पावणेतीन लाखांचा चरस जप्त

Amit Kulkarni

सांखळीत महाशिवरात्रीनिमित्त शिक्षकांनी बनविले पर्यावरणप्रिय प्रवेशद्वार

Amit Kulkarni

वास्कोत व्यापाऱयांचा स्वंयघोषीत लॉकडाऊन

Omkar B

इसमाच्या मृत्यूप्रकरणी सहाही संशयित आरोपातून मुक्त

Amit Kulkarni

डिपीआर मंजुरी रद्द न झाल्यास आंदोलन

Amit Kulkarni

आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात लेखी पत्र पंचायत सल्लामसलत करणार– गुळेली पंचायत

Patil_p