Tarun Bharat

ओसाका, मर्टेन्स चौथ्या फेरीत

वृत्तसंस्था/ मियामी

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाने पहिल्यांदाच या स्पर्धेत चौथ्या फेरीत स्थान मिळविले आहे. त्याचप्रमाणे बेल्जियमची मर्टेन्स, स्पेनची मुगुरूझा यांनीही चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.

प्रतिस्पर्धी स्टोजेनोव्हिकने तिसऱया फेरीतील सामना सुरू होण्यापूर्वी दुखापतीमुळे माघार घेतल्याने जपानच्या ओसाकाला चौथ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी पुढे चाल मिळाली. दुसऱया एका सामन्यात बेल्जियमच्या मर्टेन्सने इस्टोनियाच्या कोंटावेटचा 6-2, 0-6, 6-2 तसेच स्पेनच्या मुगुरूझाने कॅलिनस्कायाचा 4-6, 6-3, 6-4, कॅनडाच्या अँड्रेस्क्यूने अमेरिकेच्या ऍनीसिमोव्हाचा 7-6 (7-4), 6-7 (2-7), 6-4, टय़ुनेसियाच्या जेबुरने अमेरिकेच्या सोफिया केनिनचा 6-4, 4-6, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

लंकेला 40 धावांची आघाडी, जयसूर्याचे 5 बळी

Patil_p

खेडवासिय ठरले खऱया अर्थाने ‘कोरोना वॉरियर्स’

Patil_p

बेंगळूर बुल्स उपांत्य फेरीत

Patil_p

अविनाश साबळे, प्रियांका गोस्वामीला रौप्य

Patil_p

अफगाणची आयर्लंडवर विजयी आघाडी

Patil_p

बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर यजमानांची दाणादाण

Patil_p