Tarun Bharat

ओसाका विजयी, मरे पराभूत

Advertisements

वृत्तसंस्था/ मेलबर्न

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मेलबर्न खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीत ब्रिटनच्या अँडी मरेचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. अर्जेंटिनाच्या फॅकन्डो बॅगनीसने त्याचा पराभव करत विजयी सलामी दिली.

17 जानेवारीपासून येथे ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची टेनिस स्पर्धा आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात अर्जेंटिनाच्या बॅगनीसने ब्रिटनच्या अँडी मरेचा 6-3, 5-7, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेतून प्रकृती बिघडल्याने किरगॉईसने शेवटच्याक्षणी माघार घेतली आहे.

महिला एकेरीच्या सामन्यात जपानच्या ओसाकाने फ्रान्सच्या कॉर्नेटचा 6-4, 3-6, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. बऱयाच दिवसानंतर ओसाकाने या स्पर्धेत आपले पुनरागमन केले आहे.

Related Stories

कुंबळे पुन्हा होणार टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक?

datta jadhav

महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताला तिसरे स्थान

Patil_p

फिलिपीन्सला हरवून ऑस्ट्रेलिया उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

प्रीती-शिल्पाच्या संघात आज चुरस

Patil_p

हैदराबादचा नटराजन आयपीएलमधून बाहेर

Amit Kulkarni

सिंधू, प्रणितला सोपा ड्रॉ, चिराग-सात्विकसमोर अनेक आव्हाने

Patil_p
error: Content is protected !!