Tarun Bharat

ओसीआय कार्ड धारकांसंबंधी केंद्र कठोर

Advertisements

पत्रकारिता, मिशनरी अन् तबलीग कार्यांसाठी विशेष अनुमती आवश्यक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृह मंत्रालयाने ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया (ओसीआय)साठी नवे नियम लागू केले आहेत. आता अशा नागरिकांना भारतात पत्रकारिता, मिशनरी किंवा ‘तबलीग’शी संबंधित कार्यांसाठी विशेष अनुमती घ्यावी लागणार आहे. ओसीआय कार्डधारकाला कुठल्याही उद्देशासाठी मल्टीपल एंट्री लाइफलाँग व्हिसाचा अधिकार आहे, पण संशोधन,  मिशनरी तसेच तबलीग आणि गिर्यारोहण अन् पत्रकारितेशी संबंधित कार्यात सामील होण्यासाठी फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा भारतीय दूतावासाकडून विशेष अनुमती घ्यावी लागणार असल्याचे केंद्र सरकारने एका अधिसूचनेत नमूद केले आहे.

2019 मध्ये छापण्यात आलेल्या ‘ब्रोशर’मध्ये हे नियम सामील होते, पण त्यांना अलिकडेच अधिसूचित करण्यात आले आहे.

2019 साली केंद्र सरकारने लेखक आणि पत्रकार आतिश तासीरचे ओसीआय कार्ड रद्द करण्याचे पाऊल उचलले होते. तासिरने या निर्णयाच्या काही दिवसांपूर्वी टाईम नियतकालिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वत्रिक निवडणुकीवर ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ या मथळय़ासह एक टीकात्मक लेख लिहिला होता. आतिश यांनी त्यांचे वडिल पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहिती लपविली होती, असे गृह मंत्रालयाने म्हणत ओसीआय कार्ड रद्द केले होते. आतिश ब्रिटिश नागरिक असून पाकिस्तानचे दिवंगत राजकीय नेते सलमान तासीर आणि भारतीय पत्रकार तवलीन सिंग यांचा पुत्र आहे.

एनआरआयसारखे अधिकार

भारतीय वंशाच्या काही विदेशी नागरिकांना भारत ओसीआयचा दर्जा देतो. त्यांना काही प्रकरणांमध्ये अनिवासी भारतीयांसमान अधिकार प्राप्त आहेत. कृषी भूमी वगळता उर्वरित अचल मालमत्तेची खरेदी किंवा विक्रीत दोघांनाही समान अधिकार मिळालेले आहेत. काही प्रवेशपरीक्षा तसेच भारतीय मुलांना दत्तक घेण्याशी संबंधित अधिकार दोघांसाठी समान आहेत.

कुणाला मिळते ओसीआय कार्ड?

कुठल्याही अन्य देशाचा असा नागरिक भारताची घटना लागू झाल्यावर कुठल्याही काळात भारताचा नागरिक राहिलेला असेल.

कुठल्याही अन्य देशाचा असा नागरिक जो भारताची घटना लागू झाल्यावर नागरिक होण्याची योग्यता बाळगत असेल.

घटना लागू झाल्यावर कुठल्याही काळात भारताचे नागरिक राहिलेल्या व्यक्तीचे पुत्र-कन्या, नातू-नात आणि पणतू यांना याचा अधिकार.

पाकिस्तान अन् बांगलादेशचे नागरिकत्व बाळगणाऱया लोकांसाठी ही सुविधा नाही.

Related Stories

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाला प्रारंभ

Patil_p

भारत-चीनमधील तणाव कमी करण्यासाठी पंचसूत्री फॉर्म्युला

datta jadhav

प्रत्यक्ष करांच्या संकलनात विक्रमी वाढ

Patil_p

एअर इंडियाचा व्यवहार संपूर्णपणे देशविरोधी : सुब्रमण्यम स्वामी

prashant_c

युपीएससी टॉपर टीना डाबीचा घटस्फोटासाठी अर्ज

Patil_p

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये ‘आपत्ती’

Patil_p
error: Content is protected !!