Tarun Bharat

ओ रक्तगट असलेल्यांना सर्वात कमी धोका

जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वेग पकडू लागल्याने आता सर्वांच्या नजरा लसीवर केंद्रीत झाल्या आहेत. याचदरम्यान एका संशोधनात रक्तगट आणि कोरोना संक्रमणाचा संबंध दिसून आला आहे. रक्तगटावर संसर्गाची तीव्रता काही प्रमाणात अवलंबून असल्याचे निदर्शनास आले आहे.

अनल्स ऑफ इंटरर्नल मेडिसीनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार टाइप ओ आणि आरएच-निगेटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना संक्रमण होण्याचा धोका सर्वात कमी असतो. संशोधनात 2,25,556 कॅनेडियन लोकांना सामील करण्यात आले होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात रक्तगट ए, एबी, बीच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा धोका सुमारे 12 टक्के आणि गंभीर कोविड-19 होण्याचा आणि मृत्यूचा धोका सुमारे 13 टक्क्यांनी कमी दिसून आला आहे. ज्या लोकांचा रक्तगड आरएच निगेटिव्ह आहे, त्यांना कोविड-19पासून काही प्रमाणात सुरक्षा प्राप्त आहे. तर ओ निगेटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांना सर्वात कमी धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टोरंटोच्या सेंट मायकल हॉस्पिटलचे डॉक्टर आणि संशोधक जोल रे यांच्यानुसार या लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी विशेष अँटीबॉडी असावी. पुढील संशोधन याच अँटीबॉडी संदर्भात केले जाणार आहे. गंभीर कोविड-19 रुग्णाप्रकरणी व्हिटामिन डी पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावाही करण्यात आला आहे.

शरीरात व्हिटामिन डीची पातळी कमी झाल्यास कोविड-19 चा धोका अधिक असल्याचे काही संशोधनात दिसून आले आहे. शरीरात व्हिटामिन डीचे प्रमाण अधिक असले तरीही कोरोना संक्रमणाचा धोका कमी होणार नसल्याचे नव्या संशोधनात आढळून आले आहे. गंभीर आजारी असलेल्या कोरोनाबाधितांना व्हिटामिन डी दिल्याने त्यांच्या उपचारात कुठलीच मदत होत नसल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

अँटीबॉडीसह जन्म

सिंगापूरच्या एका महिलेने नोव्हेंबरमध्ये एका मुलाला जन्म दिला असून त्याच्यात कोरोनाची अँटीबॉडी आढळून आली आहे. मार्चमध्ये गरोदरपणादरम्यान महिला संक्रमित झाली होती. यातून संक्रमण आईतून बाळात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. गरोदर महिलेतून भ्रूणामध्ये संक्रमण पोहोचू शकते हे स्पष्ट नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

Related Stories

ब्रिटिश महाराणीच्या हत्येसाठी पोहोचला भारतीय शीख

Patil_p

डचेस ऑफ ससेक्सने जिंकली न्यायालयीन लढाई

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या रेस्टॉरंट्समध्ये कर्मचाऱयांची टंचाई

Patil_p

तैवानमध्ये साई इंग-विन विजयी

Patil_p

मारिउपोलवर संपूर्ण नियंत्रणाचा रशियाचा दावा

Patil_p

ब्राझीलमध्ये 30 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav