Tarun Bharat

औंध पोलिसांनी पकडला 75 पोती गुटखा

वार्ताहर/ औंध  

विटा ते पुसेसावळी रस्त्यावर गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱया शिवनाकवाडी (ता. बत्तीसशिराळा) येथील दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून गुटख्याची 6 लाख 34 हजार रुपये किंमतीची 75 पोती, 6 लाख रुपये किंमतीची इर्टिगा कार असा सुमारे बारा लाख चौतीस हजार रुपयांचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला असून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ही पोती बसवण्यासाठी इर्टिगातील मागिल सिट काढून विशेष सोय करण्यात आली होती असे पोलिसांनी सांगितले.

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, पुसेसावळी ते चोराडे रस्त्यावर गस्त घालत असताना औंधचे सपोनि उत्तम भापकर, पोलीस नाईक संतोष कोळी, प्रशांत पाटील, वळकुंद्रे, पोळ, शिंदे, होमगार्ड नलवडे, महामुनी, हुलगे यांच्या पथकाला चारचाकी इर्टिगा गाडी एमएच 08 झेड 2471 मध्ये मागील बाजूस 75 पोती व चार बॉक्स गुटखा बेकायदेशीरपणे ठेवल्याचे आढळून आले. हा सर्व मुद्देमाल व संशयित स्वप्नील सुरेश शेंडके (वय 21) व आकाश विजय पवार (वय रा. शिवनाकवाडी ता.बत्तीस शिराळा) यांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पोलीस अधिक्षक बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उत्तम भापकर व पोलीस कर्मचारी  अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

शिवसेनेच्या शहर प्रमुखांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Patil_p

खेडमध्ये दोन वर्षानंतर जनावरांच्या कत्तलीची पुनरावृत्ती!

Patil_p

कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

Archana Banage

देशात 1.76 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

मार्च महिन्यातील भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्यास मुदतवाढ – खासदार संजय मंडलिक

Archana Banage

सातारा शहर पोलिसांनी परत केले 11 तोळे सोने

Patil_p