Tarun Bharat

औद्योगिक कामगार संघटनेकडून २६ नोव्हेंबर रोजी भारत बंदचे आवाहन

पुलाची शिरोली / वार्ताहर

दि.२६ नोव्हेंबर रोजी औद्योगिक कामगार संघटनेकडून भारत बंदचे आवाहन करण्यासाठी कोल्हापूर शहरातुन मोटरसायकल रॅली काढणार आहेत. अशी माहिती कॉ. प्रकाश कांबरे यांनी दिली.

मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार व शिक्षण धोरण उध्वस्त करणारे कायदे करत आहे. जर शेतकरी, कामगार उध्वस्त झाले तर छोटे व्यावसायीक, दुकानदार व हातावर पोट असणाऱ्यांचे आयुष्यही उध्वस्त होईल त्यामुळे संविधान दिनी कोल्हापूरमधील दुकानदारांनी बंद पाळावा, तसेच छोटे व्यावसायीक, रिक्षा वाहतुकार वडाप इत्यादीनी बंद पाळुन सहकार्य करावे असे आवाहन मेकॅनिकल अॅण्ड इंजिनिअरिंग कामगार युनियनने केले आहे. बंदचे आवाहन करणेसाठी सकाळी शहरातुन मोटरसायकल रॅली काढण्यात येईल. शिरोली श्रमिक येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत निर्णय करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष कॉ.अतुल दिघे हे होते.

सभेत कॉ. प्रकाश कांबरे, अर्जुन जाधव, संजय गावडे, उत्तम माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजकुमार जाधव यांसह सर्व कंपन्याचे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Stories

संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणांतील पाण्याचे विसर्गाचे नियोजन आवश्यक

Archana Banage

दिलासादायक बातमी : कोल्हापूरात आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

‘गोकुळने म्हैस दूध दर प्रति पॉईंट चाळीस पैसे करावे’

Archana Banage

रथसप्तमीनिमित्त कोडोली बसस्थानकात प्रवासी दिन साजरा

Archana Banage

कोल्हापूर : कायम विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान दयावे

Archana Banage

जयसिंगपूर बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील पूल उभारणीस २ कोटी २५ लाखांचा निधी मंजुर

Archana Banage