Tarun Bharat

औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत 37 कामगार बाधित?

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

येथील औद्योगिक वसाहतीत अत्यावश्यक सेवेतल्या कंपन्यांना कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून काही अटीवर प्रशासनाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेल्याचे समजते. परंतु काही कंपन्या रेटून सुरु आहेत. त्या कंपन्यापैकी एका कंपनीतील 37 कामगार पॉझिटीव्ह आल्याची माहिती गोपनियरित्या महसूलच्या अधिकाऱयांना मिळाली. अधिकारी तेथे गेले अन् मोकळय़ा हाताने त्या कंपनीच्या दारापासून परत आल्याची साताऱयात जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, मास भवनशी संपर्क साधला असता आमच्यापर्यंत तशी कोणतीही माहिती नाही, असे संगितले.

कोरोनाचा कहर वाढत असताना त्याचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून अनेक नियम आहेत. असेच नियम साताऱयातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनाही लागू आहेत. मात्र, काही कंपन्या नियम डावलून कंपन्यांमध्ये उत्पादन सुरु आहे. कामगारांना एकत्रीतच बोलवणे केले जाते. कंपनीमध्ये काम मात्र सुरु असल्याने एका कंपनीतील 37 कर्मचाऱयांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली. त्या कंपनीतील इतर कर्मचाऱयांनी आपल्याला कोरोना होईल याची भिती खाल्ली असून याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. महसूलचे अधिकारी तेथे गेले होते. ते काहीच न करता परत कसे आले. त्याचीच चर्चा सुरु होती. साताऱयातल्या औद्योगिक वसाहतीत काही कंपन्यांमध्ये अजूनही नियम मोडून कामकाज सुरु आहे. त्यामुळे कोरोना फोफावण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाकडून ठोसपणे कारवाई होताना दिसत नाही. ती कंपनी एमआयडीसी पोलीस चौकीपासून काही अंतरावर आहे. त्या कंपनीमध्ये अनेक कामगार काम करतात. इतर कामगारांनाही कोरोनाच्या भिती असल्याने नेमकी कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, तरुण भारतने मासशी संपर्क साधून याबाबत त्या कंपनीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या घटनेबाबत काहीच माहिती नसल्याचे मास कार्यालयातून सांगण्यात आले.

Related Stories

सातारा : ‘होम आयसोलेशन’ रूग्णांनी नियम पाळणे गरजेचे – जिल्हा आरोग्य अधिकारी

Abhijeet Shinde

सातारा : कोरेगाव मार्केट कमिटीचे माजी सभापती आनंदराव निकम कालवश

Abhijeet Shinde

‘त्या’ पिढीत कुटुंबाच्या न्यायासाठी वंचितचे आंदोलन

Abhijeet Shinde

साताऱ्यातील शिवस्मारकाचे काम रखडल्याने छावा आक्रमक

datta jadhav

पालिकेच्या तीन गाडय़ा भंगारात

Patil_p

मोही जुगार अड्ड्यावर छापा 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!