Tarun Bharat

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15 हजारच्या उंबरठ्यावर

Advertisements

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : 


औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात आज सकाळी 98 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये ग्रामीण भागातील 62 तर मनपा हद्दीतील 36 जणांचा सहभाग आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या 14,992 इतकी झाली आहे. जिल्ह्यात  11,229 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


मनपा हद्दीतील रुग्णांमध्ये एमजीएम परिसर 1, नागेश्वरवाडी 1, खडकेश्र्वर 1, पुंडलिक नगर 3, जवाहर कॉलनी 3, एन नऊ पवननगर 1, गुरुकृपा अपार्टमेंट, समर्थनगर 1, प्रकाश नगर 1, पद्मपुरा 2, नंदनवन कॉलनी 1, एम दोन रामनगर 3, अजब नगर 1, एन पाच गुलमोहर कॉलनी 1, विनायक नगर 1, जय भवानी नगर 1, बालाजी नगर 1, एन सहा सिडको 1, पवन नगर 1, सिटी टॉवर 1, हडको परिसर 1 विजय नगर 1 आणि चिकलठाणा मधील तिघांचा  समावेश आहे. 


तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये बिल्डा फुलंब्री 1, अडूळ पैठण 1, सरकारी दवाखाना परिसर 1, बोरगाव 1, तजनापूर 2, द्वारकानगरी बजाज नगर 4, त्रिमूर्ती चौक 1, चिंचबन कॉलनी, बजाज नगर 1, गणोरी पैठण 22, रांजणगाव 1, नांदूर पैठण 6, हतनूर कन्नड 1, काळे कॉलनी, सिल्लोड 4, टिळक नगर 3, श्रीकृष्ण नगर, सिल्लोड 1, शास्त्री नगर 1, देऊळगाव बाजार, सिल्लोड 1, स्नेह नगर 5, शिवाजी रोड वैजापूर  3, वैजापूर 1 आणि भाटिया गल्ली मधील एकाचा समावेश आहे. 


सध्या, जिल्ह्यात 3276 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत  250 पेक्षा अधिक जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

Related Stories

जवानांना आता वज्र अन् त्रिशूळाचाही आधार

datta jadhav

कर्नाटकात गेल्या २४ तासात १ हजार ४६४ नवीन रुग्ण, तर २९ मृत्यू

Abhijeet Shinde

कर्नाटकातील फास्टर बोटी राज्याच्या हद्दीत

Abhijeet Shinde

सहकारी बँका, कारखाने या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी द्या : रोहित पवार

prashant_c

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद ; विटा पोलिसांची कारवाई

Abhijeet Khandekar

मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहतील : आयुक्तांचे आदेश

Rohan_P
error: Content is protected !!