Tarun Bharat

औरंगाबाद येथे झालेल्या स्पर्धेत दोनवडेतील कुस्तीगिरांचे यश

Advertisements

उत्रे / वार्ताहर

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या पंधरा वर्षाखालील फ्रीस्टाईल व ग्रिको-रोमन मुले व मुली राज्यस्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत एन.आय.एस कुस्ती प्रशिक्षण केंद्र दोनवडे तालुका करवीर, या कुस्ती संकुलातील खालील कुस्तीपटूंनी घवघवीत यश संपादन केले.

यश संपादन केलेल्या सर्व कुस्तीपटूंची निवड ही रांची या ठिकाणी होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे आहेत. श्रावणी महादेव लव्हटे 36 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, जानवी गोडसे 58 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, ओम चौगुले 44 किलो आळवे पन्हाळा वजनी गटात प्रथम क्रमांक, सिद्धनाथ पाटील 48 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, वरील सर्व कुस्तीपटूंना एन. आय.एस कुस्ती केंद्राचे संस्थापक हरी पाटील व रावसो इंगवलेपाडळी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.

Related Stories

तलावात जनावरे-वाहने धुण्यास बंदी; प्रदूषण करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

Abhijeet Shinde

दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या आदेशाची होळी

Sumit Tambekar

तरूणांच्या नवसंकल्पनेतूनच देश आत्मनिर्भर होईल

Sumit Tambekar

Kolhapur : ‘हायब्रीड ऍन्युटी’अंतर्गत मंजूर रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करा

Abhijeet Khandekar

शहरवासियांना फुकट पाणी देता का?

Abhijeet Shinde

शासनाच्या दिरंगाईमुळे पुनर्वसन न झाल्याने पूरग्रस्तांची ससेहोलपट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!