Tarun Bharat

औषधांवरील साडेसहा कोटींचा कर माफ; पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

मुंबईतील एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधी अमेरिकेतून आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दरम्यान तिरा कामत या मुंबईतील पाच महिन्यांची बालिकेला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी लोकांनी क्राऊड फंडींगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. क्राऊड फंडींगच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी रूपये गोळा करण्यात आले आहेत. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून भारतामध्ये आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे साडेसहा कोटी रूपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात फडणवीस यांनी पत्राचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

पालकांच्या मागणीनंतर तिरा कामतच्या उपचारासाठी अमेरिकेतून मागवण्यात येणाऱ्या औषधाला करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश देताच, तातडीने त्यावर कार्यवाही झाली आणि त्यानुसार, मंगळवारी नऊ फेब्रुवारीला या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला.

Related Stories

परखंदळे: पंचवीस वर्षातील रेशन भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

Abhijeet Shinde

लॉक डाऊनमध्ये भाजी विक्रीचा धंदा फर्मात

Patil_p

दर्पण पुरस्कार वितरण तरुण भारत प्रतिनिधी प्रा.रमेश आढाव यांचा पुरस्कारात समावेश

Patil_p

हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घ्या…

datta jadhav

सोमर्डी आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगली सेवा द्या – आ. शिवेंद्रसिंहराजे; सिव्हील सर्जन डॉ. गडीकर यांना केल्या सुचना

Abhijeet Shinde

राष्ट्रीय महिला कुस्ती निवड चाचणीत कोल्हापूरचा दबदबा

datta jadhav
error: Content is protected !!