Tarun Bharat

औषधे, ऑक्सिजन, लसी पुरवठय़ावर भर द्या !

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री 8 वाजता कोरोना नियंत्रणासाठी महत्त्वाच्या अधिकाऱयांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत विविध मंत्रालयातील सचिव आणि वरि÷ अधिकारी सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी यावेळी सर्वांना कोरोना स्थितीवर बारकाईने नजर ठेवण्याची सूचना केली. तसेच कोरोना उपचारांसाठी लागणारी औषधे, ऑक्सिजन आणि नव्याने आलेल्या लसींचा योग्य पुरवठा करण्यावर प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात लोकांच्या गरजा लक्षात घेता स्थानिक प्रशासन अधिक सक्रिय व संवेदनशील असले पाहिजे, जेणेकरून साथीवर नियंत्रण मिळू शकेल. कोरोना रुग्णांच्या चाचणी, मागोवा आणि उपचारांना पर्याय नाही. रुग्णालयात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी रेमडेसिविर इंजेक्शन व इतर आवश्यक औषधांच्या उपलब्धतेचा आढावाही घेतला. बैठकीत मोदींनी आधीपासून मंजूर ऑक्सिजन प्रकल्पांच्या उभारणीची प्रक्रिया वेगवान करण्याच्या सूचना दिल्या. लस उत्पादन वाढीसाठी देशातील उपलब्ध क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

गेल्या काही दिवसात देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक लाखोच्या संख्येने कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच आता ही रुग्णसंख्या वाढ सर्व स्तरांवर दहशतीचे वातावरण निर्माण करु लागली आहे. देशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान लॉकडाऊनसारखा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरुवातीला होती.  तथापि, बैठकीअंती त्यांनी देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

Related Stories

इस्रोच्या बजेटमध्ये कपात

Omkar B

बाधित घटले, डिस्चार्ज वाढले!

Patil_p

गॅस सिलिंडर दराचा ‘स्फोट’

Patil_p

जेएनयू राडाप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

prashant_c

मेट्रो-३ ला कोणीही थांबवू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

Archana Banage

कोरोना : दिल्लीतील बाधितांनी ओलांडला 6.30 लाखांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!