Tarun Bharat

कंकणवाडीजवळ कासव विकणाऱया तरुणाला अटक

कासव जप्त, वनविभागाच्या फिरत्या पथकाची कारवाई

 प्रतिनिधी /बेळगाव

कंकणवाडीजवळ कासव विकणाऱया एका तरुणाला वनविभागाच्या फिरत्या पथकाने अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून एक कासव जप्त करण्यात आला आहे.

सिध्दाप्पा नागाप्पा कागल (वय 24, रा. तुक्कानट्टी, ता. गोकाक) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तुक्कानट्टीहून विक्रीसाठी कंकणवाडीकडे नेताना पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार आर. बी. यरनाळ, के. डी. हिरेमठ आदींनी त्याला अटक केली आहे.

जंगल प्रदेशातून आणलेल्या या कासावाचे वजन 600 ग्रॅम इतके आहे. विक्रीसाठी नेताना सिध्दाप्पाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर वन्यजीवी संरक्षण कायदा 1972 चा कलम 9, 39, 44 व 51 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याला गोकाक येथील जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Related Stories

मच्छे ग्राम पंचायतीमध्ये 15 लाखाची अफरातफर

Patil_p

बहुमजली इमारतींमधील पार्किंग रस्त्यावर

Amit Kulkarni

सीमाप्रश्न लवकरात लवकर निकालात काढा

Patil_p

राखीव दलाचे कमांडंट हमाजा हुसेन यांचा सत्कार

Amit Kulkarni

युनियन जिमखाना, दाभोली संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

आकांक्षा गणेबैलकरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni