Tarun Bharat

कंगनाच्या ‘इमरजेंसी’मध्ये सतीश कौशिक

Advertisements

जगजीवन राम यांची भूमिका साकारणार

बॉलिवूडची ‘धाकड’ अभिनेत्री कंगना रनौत सध्या ‘इमरजेंसी’ या चित्रपटावरून चर्चेत आहे. चित्रपटाच्या सेटची तसेच कलाकारांची अनेक छायाचित्रे शेअर करत तिने चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. कंगनाने आता चित्रपटातील एका नव्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. ही व्यक्तिरेखा प्रतिभावंत अभिनेता सतीश कौशिक साकारणार आहेत.

या चित्रपटात सतीश कौशिक हे राजकीय नेते जगजीवन राम यांची भूमिका साकारत आहेत. पोस्टरमध्ये खादी टोपी, जॅकेट परिधान केलेले सतीश कौशिक हे स्वातंत्र्यसेनानी आणि राजकीय नेते जगजीवन राम यांच्यासारखेच दिसून येत आहेत.

जगजीवन राम यांना ‘बाबूजी’ देखील म्हटले जायचे, ते भारतीय राजकारणाच्या इतिहासात सर्वात प्रसिद्ध नेत्यांपैकी एक होते असे कंगना रनौतने म्हटले आहे. जगजीवन राम यांनी जयप्रकाश नाराण यांच्यासोबत मिळून इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशभरात आंदोलन केले होते. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांच्याकडून लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या घटनेला चित्रपटात दर्शविण्यात येणार आहे.

कंगना रनौतच्या या चित्रपटात अनुपम खेर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे अणि महिमा चौधरी हे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा कंगना रनौतच साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना स्वतःच करत आहे.

Related Stories

अनुराधा पौडवाल माझी आई, केरळमधल्या महिलेचा दावा

prashant_c

फॅनफॉलोइंगचा गायत्रीने केला असा वापर

Patil_p

वेबसीरीजसाठी कथानकाची निवड महत्त्वाची : स्वप्निल जोशी

tarunbharat

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

Archana Banage

सलमानने थाटलं नव ऑफिस

Patil_p

सुशांत आत्महत्या : पाटण्याचे IPS विनय तिवार यांची क्वारंटाइनमधून मुक्तता

Tousif Mujawar
error: Content is protected !!