Tarun Bharat

कंगना करणार 20 किलो वजन कमी

जयललिता यांच्या आयुष्यावरील ‘थलायवी’ या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे काही शूटिंग पूर्ण झाले आहे. या भूमिकेसाठी कंगनाने 20 किलो वजन वाढवले होते. पण आगामी ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांसाठी अवघ्या दोन महिन्यात ती 20 किलो वजन कमी करणार आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा प्रवास ‘थलायवी’मध्ये असणार आहे. कंगनाची बहीण रंगोल चंडेलने ट्विट करत सांगितले की, ‘थलायवी’चे शेवटचे शूटिंग बाकी आहे. त्यासाठी तिने 20 किलो वजन वाढवले आणि आता पुढील दोन महिन्यात ती 20 किलो वजन कमी करणार आहे. कंगनानेही आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर करत व्यायामाची माहिती दिली. ‘थलायवी’चे शूटींग पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा व्यायाम सुरू होणार आहे. सध्या ‘थलायवी’साठी कंगनाचे वजन 73 किलो इतके आहे. तिला पुन्हा 53 किलो वजन करणे गरजेचे आहे. ‘थलायवी’ या चित्रपटाचे लेखन ‘बाहुबली’ तसेच ‘मणिकर्णिका’ या चित्रपटांचे लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद आणि ‘डर्टी पिक्चर्स’ आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’चे लेखक रजत अरोरा यांनी मिळून केले आहे. 26 जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

जान्हवीने खरेदी केले नवे घर

Patil_p

सोनाली करणार तमाशा लाईव्ह

Patil_p

आमिरसोबत काम करणार नागार्जुनचा पुत्र

Patil_p

आरआरआर’च्या ‘सीता’चा लुक जगासमोर

Patil_p

ड्रग्ज प्रकरण : एनसीबीकडून अंधेरीत 4 ठिकाणी छापे

Tousif Mujawar

दिल्लीत हे काय करू लागला राजकुमार राव!

Amit Kulkarni