Tarun Bharat

कंग्राळी खुर्द ग्रा. पं. मध्ये 11 अर्ज अवैध

एकूण 18 प्रभाग : 27 सदस्य पदासाठी होणार चुरशीची लढत

वार्ताहर/ कंग्राळी खुर्द

बेळगाव तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली आहे. ग्राम पंचायतींना मोठय़ा प्रमाणात निधी मिळत असल्याने इच्छुकांच्या भाऊगर्दीत दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतमध्ये 115 इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये शनिवारी छाननीवेळी 11 अर्ज बाद झाले. ही लढत 27 ग्रा. पं. सदस्यांसाठी होणार आहे.

कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीमध्ये अलतगा गावचा समावेश आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी कमी करण्यासाठी प्रभागाऐवजी 4 प्रभाग वाढवून 18 प्रभाग करण्यात आले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र समोर येणार आहे. ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे. यामध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे.

कगांळी खुर्द ग्राम पंचायतीमध्ये ग्राम पंचायत माजी सदस्य दुसऱयांदा तर काहीजण तिसऱयांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बऱयाच प्रभागांमध्ये अनेक अर्ज आल्याने वार्डमदील जाणकारांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी साम, दाम, दंडाचा वापर करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी प्रभागातील जाणकर लोक त्यांची समजूत काढून योग्य उमेदवार निवडण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. काही प्रभागामध्ये त्यांना यश आल्याची चर्चा परिसरात चर्चिली जात आहे. तरी कंग्राळी खुर्द परिसरातील मतदारांचे लक्ष सोमवारी होणाऱया माघारीनंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीच्या 27 उमेदवारांपैकी कंग्राळी खुर्दमधून 23 उमेदवार तर अलतगा गावामधून 4 उमेदवारांची निवड होणार आहे.

Related Stories

वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये जुंपले

Amit Kulkarni

दोन दिवसात १० टन ऊस पूर्णपणे उध्वस्त

mithun mane

खानापूर तालुक्यात आता रुग्णवाहिकांची संख्या वाढली

Omkar B

विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

Patil_p

तालुक्यात रामनवमी उत्साहात साजरी

Amit Kulkarni