Tarun Bharat

कंग्राळी खुर्द येथे माजी आमदार कै. बी.आय. पाटील यांना श्रद्धांजली

Advertisements

कंग्राळी बुद्रुक ः

 कंग्राळी खुर्द येथील श्री बालहनुमान तालीम, मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ग्रामपंचायत, श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थान, गावडे कमिटी, पाटील गल्ली गणेशोत्सव मंडळ व शिवजयंती उत्सव मंडळ, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांच्या वतीने माजी आमदार बी. आय. पाटील यांना द्वितीय स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली.

या निमित्ताने गावातील मुख्य चौकात झालेल्या कार्यक्रमांत सुरुवातीला विविध देवदेवतांना गावातील विविध संघटना पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर कै. बी. आय. पाटील यांच्या तैलचित्राला ग्रा. पं. माजी अध्यक्ष भाऊ पाटील व उपस्थित ग्रा. प. सदस्यांनी पुष्पहार अर्पण केला. ग्रा. प. अध्यक्ष यल्लापा पाटील यांनी श्रीफळ वाढवले. याचबरोबर उपास्थित वरील सर्व संघटनांसह, मार्कंडेय व्यायाम मंदिर पदाधिकाऱयांनी व ग्रामस्थांनी तैलचित्रावर पुष्प वाहिले. त्यानंतर उपस्थितांनी एक मिनीट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मार्कंडेय व्यायाम मंदिरचें किसन पाटील व ग्रा. पं. अध्यक्ष यल्लापा पाटील यांनी श्रद्धांजली वाहताना त्यांचे साधेपण, सामाजिक व सीमाप्रश्नासंदर्भात कार्याची माहिती व्यक्त करून त्यांचे सीमाप्रश्न सोडविण्याचे स्वप्न पूर्ण करूया. हिच खरी श्रद्धांजली असल्याचे सांगतिले. यावेळी ग्रा. पं. सदस्य, गावातील विविध संघटना पदाधिकारी, सभासद, त्याचे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. डी. पाटील यांनी केले.

बी. आय. पाटील यांच्या दुसऱया स्मृतिदिनानिमित्त बाल हनुमान तालीम मंडळ, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष व ग्रां. पं. सदस्य प्रशांत पाटील यांच्या सौजन्याने बाळू मोहनगेकर या अपघातात पाय गमावलेल्या तरुणाला तिनचाकी सायकल भेटीदाखल देऊन एक विधायक कार्य केले. तसेच म्हैसूर येथे झालेल्या दसरा स्पर्धेत रौप्य व कांस्यपदक विजेत्या पाच कुस्तीपटूना कै. माजी आमदार बी. आय. पाटील स्मृतिप्रित्यर्थ ट्रक सूट भेट देण्यात आल्या.

Related Stories

कडोलीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन

Omkar B

एम. व्ही. हेरवाडकर स्कूलमध्ये एनसीसी विंगचे उद्घाटन

Amit Kulkarni

उसाची उचल करण्यासाठी शेतकऱयांची धावपळ

Omkar B

उड्डाणपुलावरील पथदीप दिवसरात्र सुरूच

Amit Kulkarni

म. ए. युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण

Amit Kulkarni

शहरासह ग्रामीण भागात थंडी कायम

Amit Kulkarni
error: Content is protected !!