Tarun Bharat

कंग्राळी बुद्रुक साई मंदिरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

येथील साई कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी शुक्रवारी साई मंदिरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी जवळपास 200 नागरिकांनी या लसीचा लाभ घेतला.

सध्या कोरोना महामारी परत डोके वर काढत असल्यामुळे प्रत्येक नागरिकांने कोरोना महामारीचे दोन्ही डोस घेतलेच पाहिजेत, असा शासनाने फतवा काढला असला तरी प्रत्यक्षात शासनाकडून कोरोना लस अगदी कमी प्रमाणात मिळत आहे. अजूनही ग्रामीण भागामधील बरेच नागरिक कोरोना लसीच्या तुटवडय़ामुळे लसीपासून वंचित आहेत. तेव्हा शासनाने कोरोना लसीचे अधिकाधिक उत्पादन करावे. सर्वांचे वेगाने लसीकरण करून कोरोनाला हद्दपार करून सुदृढ भारत बनविण्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांकडून व्यक्त होत होत्या.

कुपन पद्धतीमुळे नागरिकांची सोय

कोरोना लसीकरण करतेवेळी प्रत्येक ठिकाणी 200 कोरोना लस आल्या तर जवळ जवळ 2000 नागरिक लसीकरणासाठी रांगेमध्ये थांबत होते. परंतु, यामध्ये 200 नागरिकांनाच लस मिळत होती. बाकीच्यांना वापस जावे लागत होते. हे होऊ नये म्हणून साई कॉलनीतील साई युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 200 नागरिकांना कुपन वाटप केले होते.

सदर लसीकरण मोहीम भाजपा जिल्हा कार्यकर्ते धनंजय जाधव यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आली होती. तसेच यावेळी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, ग्रा. पं. सदस्या मेनका कोरडे, सदस्य प्रदीप पाटील व साई युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

…तोपर्यंत सीमालढा सुरूच

Amit Kulkarni

बिग बझारची नवी योजना सुरू

Amit Kulkarni

जाहिरात फलक शुल्क वसुलीसाठी निविदा मागविण्याच्या हालचाली

Amit Kulkarni

ग्रामीण आमदारांच्या पीएंची ता.पं.फंडात ढवळाढवळ

Amit Kulkarni

मुर्कवाड येथे भिंत कोसळून माय-लेकीचा मृत्यू

Amit Kulkarni

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार गंभीर

Amit Kulkarni