Tarun Bharat

कंत्राटदाराचा गलथान कारभार चव्हाटय़ावर

Advertisements

    बेळगाव चोर्ला महामार्गावर एक महिन्यापुर्वीच खड्डे बुजविण्याचे काम केलेल्या कंत्राटदाराचा गलथान कामगार चव्हाटय़ावर आला आहे.एका महिन्यातच पुन्हा खड्डे पडल्याने संताप व्यक्त होत असून पावसाळयापुर्वी दुरूस्ती होण्याची मागणी होत आहे.चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम केल्याने केवळ एका महिन्यातच रस्ता खराब झाला आहे. एका महिन्यात येथील पॅचवर्क उखडले आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या गलथान कारभाराचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे.

    बेळगाव चोर्ला महामार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. त्यात अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याने येथील रस्ता काही ठिकाणी खचला आहे. तर काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे ते खड्डे पेव्हर्स  घालून बुजविण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच हे पेव्हर्स देखील उखडलेले पाहायला मिळत आहेत. चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम केल्यामुळे हा प्रकार घडला आहे.

   येथील रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांनी  आणि अधिकाऱयांनी आक्षेप  घेतला होता. त्यामुळे येथील काम पूर्ण करण्यात आले. मात्र आता या ठिकाणी पुन्हा एकदा खड्डे पडल्याने कंत्राटदाराला बिले न देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. जर येथील खड्डे  वेळेवर बुजविले  नाहीत तर येणाऱया पावसाळय़ात या रस्त्याची वाईट परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे येथील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी होत आहे.

Related Stories

बीएसएनएल पेन्शनर्सची थकबाकी द्या

Amit Kulkarni

नंदिहळ्ळी परिसरात रेल्वेमार्गाचा सर्व्हे सुरू

Patil_p

एम. एस. शेषगिरीतर्फे वेबिनार

Amit Kulkarni

प्रामाणिकपणे काम करा, कोणतेच काम प्रलंबित राहणार नाही

Patil_p

पशुखाद्याच्या किमतीत वाढ

Patil_p

हदनाळ, येडूर येथे सीमोल्लंघन उत्साहात

Patil_p
error: Content is protected !!