Tarun Bharat

कंत्राटदाराला शेतकऱयांनी पिटाळले

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी / बेळगाव

हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही मच्छे येथे रस्त्याचा कंत्राटदार दगड रोवून रस्ताकामाला सुरुवात करणार होता. याची माहिती शेतकऱयांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला जाब विचारला. यावेळी कंत्राटदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी कंत्राटदार आणि त्याच्या कर्मचाऱयांवर दगडफेक करून त्यांना पिटाळले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

हलगा-मच्छे बायपास रस्ता सुपीक जमिनीतून करण्यात येत आहे. त्याला शेतकऱयांनी पहिल्यापासूनच तीव्र विरोध केला आहे. तसेच त्या रस्त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगितीही मिळविली आहे. असे असताना पुन्हा बेकायदेशीररीत्या रस्ता करण्याचा प्रयत्न शुक्रवारी घडला.

शेतकऱयांनी घटनास्थळी जाऊन कंत्राटदाराला न्यायालयाने ‘आम्हाला स्थगिती दिली आहे’, असे सांगितले. त्यावर कंत्राटदाराने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आम्हाला रस्ता करण्यास सांगितल्याने आम्ही या ठिकाणी आल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी वादावादी सुरू केली. ‘या ठिकाणी पाय ठेवाल तर याद राखा’, अशी समज शेतकऱयांनी कंत्राटदाराला दिली. काही शेतकऱयांनी तर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथून कंत्राटदार आणि त्याच्या कर्मचाऱयांना पळ काढावा लागला. यावेळी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री यांच्यासह मच्छे, वडगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

किरण ठाकुर यांची ‘माय एफएम’ रेडिओवर मुलाखत

Patil_p

28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली जुन्या बसपासची मुदत

Amit Kulkarni

हलगा-मच्छे बायपासबाबत पुन्हा शेतकऱयांवर दडपशाही

Patil_p

वर्षाचा अवधी, खुनाचा तपास कधी?

Amit Kulkarni

श्रीधनलक्ष्मी सहकारी साखर कारखान्यांच्या नुतन अध्यक्षपदी मल्लेशप्पा यादवाड

Patil_p

पूरग्रस्तांची घरे तीन महिन्यांत पूर्ण करा

Patil_p
error: Content is protected !!