Tarun Bharat

कंदलगाव, नागांव मार्गावर धावणार केएमटी

हणमंतवाडी, वळीवडे, जठारवाडी मार्गांचाही समावेश

प्रतिनिधी / कोल्हापूर

कंदलगाव ते शिरोली-नागांव, हणमंतवाडी ते वळीवडे आणि जठारवाडी ते एसटी स्टँड यामार्गावर केएमटी पुर्ववत धावणार आहे. प्रवाशी वर्गातून होत असलेल्या मागणीचा विचार करुन बसफेल्या पुर्ववत करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन उपक्रमने घेतला आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून केएमटीची चाके पुर्णपणे थांबली होती. अनलॉक प्रक्रीयेमध्ये केएमटीकडून शहरातंर्गत बसफेऱया सुरु केल्या. यांनतर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर शहराबाहेरील बसफेऱयाही टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. पहिल्या टप्प्यात पेठवडगांव, कागल, रुकडी-माणगांव यामार्गावर केएमटी धावू लागली. प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याने केएमटीकडुन बसफेऱयांमध्ये वाढ करण्यात येत आहे. कंदलगाव, पुलाची शिरोली, नागांव, हणमंतवाडी, वळीवडे, जठारवाडी ही गावे पुन्हा एकदा केएमटीच्या माध्यमातून शहराशी जोडली जाणार आहेत.

  पास वितरण केंद्र नियमित सुरु

  विद्यार्थी, कर्मचारी यांच्यासाठी प्रवासी सवलत पास योजना पुर्ववत करण्यात आली आहे. शहरातील सर्व पास केंद्रे दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहाणार आहेत. तरी विद्यार्थी, कर्मचारी वर्गाने सवलत पास योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन महापालिका परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

कोल्हापुरात प्रथमच कोरोना मृत्यूसंख्या एकेरीत

Archana Banage

नवीन अंगणवाड्य़ांसाठी प्रस्ताव मागवा

Archana Banage

कोल्हापुरात पुन्हा कोरोना कहर, ५६ बळी, २ हजार १३१ नवे रुग्ण

Archana Banage

त्यानं सहा लाखाची चोरी झाल्याचं सांगितलं, पण पोलीस तपासात काही वेगळंच पुढं आलं…

Archana Banage

रूईच्या सरपंचांचा जातीचा दाखला हायकोर्टाने ठरवला वैध,करिष्मा मुजावर यांचे सरपंचपद कायम

Archana Banage

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांबरोबर आज महत्वपूर्ण बैठक

Archana Banage