Tarun Bharat

कचरा उचल करण्यासाठी घरोघरी जाणार ई-ऑटो टिप्पर

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर आणि उपनगरांतील कचऱयाची उचल घरोघरी जाऊन केली जात आहे. त्याकरिता महानगरपालिकेने वाहनांची व्यवस्था केली आहे. डिझेलवर चालणाऱया वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ई-ऑटो टिप्पर खरेदी करण्याचा विचार महानगरपालिकेने चालविला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन ई-ऑटो टिप्पर खरेदी करण्यासाठी हालचाली चालविल्या आहेत.

स्मार्ट शहर बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पण स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. याकरिता महानगरपालिकेने वाहने खरेदी केली आहेत. काही ठिकाणी भाडेतत्त्वावर वाहनांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण सदर वाहने नियमितपणे कचरा घेण्यासाठी येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कचऱयाची उचल केली जात नसल्याने रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना दुर्गंधीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी साचणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यासाठी आणखी वाहने खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. सध्या महापालिकेच्या ताफ्यात कचरा वाहतूक करणारी वाहने डिझेलवर चालणारी आहेत. डिझेलवर चालणाऱया वाहनांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढते. कचरा उचल करण्यासाठी घरोघरी जाणारी वाहने थांबत जात असतात. त्यामुळे डिझेल वाहनांचे प्रदूषण वाढते. त्यामुळे प्रदूषण रोखण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत. त्याकरिता विजेवर चालणारी वाहने खरेदी करण्याची सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर विजेवर चालणारे ई-ऑटो टिप्पर खरेदी करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 3 ई-ऑटो टिप्पर खरेदी करण्याचा प्रस्ताव असून, याकरिता लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ई-ऑटो टिप्परद्वारे 500 किलो कचरा वाहतूक करता येते. दररोज इंधन घालण्याऐवजी बॅटरी चार्ज करावी लागणार आहे. त्यामुळे इंधन घालताना होणारे गैरप्रकार टाळण्याची शक्मयता आहे. 

Related Stories

कणकुंबीत स्वखर्चाने बनविला अर्धा किलोमीटरचा रस्ता

Amit Kulkarni

स्वीत्झर्लंडमध्ये साजरी झाली शिवजयंती

Amit Kulkarni

पथनाटय़ाच्या माध्यमातून जनजागृती

Amit Kulkarni

प्रवेश वाढले; पण सुविधांचा अभाव

Amit Kulkarni

बेळगावात लवकरच केपीएलचे सामने

Amit Kulkarni

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

Omkar B