Tarun Bharat

कचरा डेपोवरील दूषित पाणी मार्कंडेय नदीत

वार्ताहर/ उचगाव

तुरमुरी कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो आणि तमाम जनतेला सातत्याने धक्क्मयामागून धक्के देतो. गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार मुसळधार पावसाचे पाणी कचरा डेपोत साचून होते. शिवाय येथील टाक्मया पाण्याने भरल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून सदर पाण्याचे लोंढे डेपोच्या बाजूने खाली वाहात येत असून मार्कंडेय नदीच्या पात्रात व शेतवडीत पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका एकीकडे तर दुसरीकडे शेतातील कोवळी पिके खराब होऊन जवळपास पन्नास ते साठ एकर जमीन रसायनमिश्रित पाण्याने नापीक बनण्याची भीती शेतकरी, ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

तुरमुरी गावाशेजारील टेकडीवर बेळगाव शहरातील सर्व कचरा व घाणीचे ढिगारे साठविण्यात आले आहेत. या भागात झालेल्या पावसामुळे कचरा कुजून दलदल निर्माण झाली आहे. तसेच या डेपोमध्ये कचऱयापासून खतनिर्मिती करण्यासाठी लहान टाक्मयांत पाणी साठविले आहे. कचऱयावर प्रक्रिया करून त्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी तुरमुरी, बाची, कोनेवाडी, उचगाव या गावांच्या दिशेने खाली वाहात येते.

कोवळय़ा पिकांचे मोठे नुकसान

कचरा डेपोच्या चोहोबाजूंनी पायथ्यालगत कोनेवाडी, तुरमुरी, उचगाव, बाची गावच्या ग्रामस्थांची हजारो एकर जमीन आहे. या जमिनीत खरीप हंगामात भुईमूग, रताळी, भात, बटाटे, ऊस, मका, भाजीपाला अशा पिकांची पेरणी नुकतीच करण्यात आली आहे. सध्या या पिकांना अंकुर फुटत असताना नेमके याचवेळी या कचरा डेपोमधील अशुद्ध व रसायनमिश्रित पाणी कोवळय़ा पिकांना रसायनमिश्रित पाण्याचा झटका सहन होत नसल्याने सध्या ही सर्व पिके खराब होऊन जमीन नापीक बनणार असल्याची मते शेतकरी व्यक्त करत आहेत.

दूषित पाणी मार्कंडेय नदीत

कचरा डेपोतील हे दूषित पाणी जवळून वाहणाऱया नाल्यात मिसळत आहे. सदर नाला थेट मार्कंडेय नदीला जाऊन मिळतो. परिणामी ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सदर दूषित पाणी जवळच असलेल्या हिंडलगा येथील पंपिंग स्टेशनद्वारे बेळगाव शहराला पुरविले जाते. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्मयात येण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

विहिरींचे पाणीही दूषित

कचरा डेपोकडून वाहणारे पाणी चोहोबाजूला पसरल्याने तसेच डेपोच्या निर्मितीपासून ते जमिनीत झिरपत असल्याने या भागातील खासगी व सार्वजनिक विहिरींमध्ये झिरपून त्यातील पाण्याचा रंग बदलत आहे. हे पाणी काळय़ा-निळय़ा रंगाचे दिसू लागले आहे. सर्व नागरिक याच पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करत असल्याने अनेकांचे आरोग्य बिघडल्याच्या तक्रारी आहेत.

Related Stories

हलगा-मच्छे बायपासप्रकरणी अधिकाऱयांना कारणे दाखवा नोटीस

Omkar B

बुडाची बैठक पुन्हा रद्द

Amit Kulkarni

अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

Patil_p

फरारी आरोपीला 13 वर्षांनंतर अटक

Omkar B

रिक्षा-ट्रक अपघातात 6 जखमी

Patil_p

बेळगावसह काही जिल्हय़ात विकेंड कर्फ्यू मागे

Amit Kulkarni