Tarun Bharat

कच्चा मालाच्या दरवाढीने फौंड्री उद्योग पुन्हा अडचणीत

Advertisements

50 टक्के उद्योग बंद पडण्याच्या वाटेवर, बेरोजगारी वाढण्याची भिती

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊननंतर फौंड्री हळूहळू पूर्वपदावर येत होता. परंतु फौंड्रीसाठी लागणाऱया कच्चा मालाच्या किंमतीत अचानक वाढ झाल्यामुळे हा उद्योग पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास बेळगावमधील फौंड्री बंद करण्याची वेळ येणार आहे. असे झाल्यास हजारो कामगार रस्त्यावर येणार असल्याने सरकारने स्ट्रीलचे दर नियंत्रणात ठेवण्याची मागणी उद्योजकांमधून होत आहे.

बेळगाव – कोल्हापूर हा परिसर फौंड्री उद्योगासाठी देशभरात ओळखला जातो. या परिसरात अनेक लहान- मोठे फौंड्रीचे कारखाने आहेत. यामधून तयार होणारे कास्टींग हे देशाबरोबरच परदेशातही निर्यात केले जातात. कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर वाहन उद्योग पूर्वपदावर येत आहे. ट्रक्टर तसेच इतर वाहनांची मागणी वाढल्यामुळे बेळगावमधील उद्योगांना चांगले काम मिळू लागले आहे.

चीन येथून होणारी स्ट्रीलची आयात भारत- चीन संबंध ताणल्याने पूर्णपणे बंद झाली आहे. देशातंर्गत काही मोजक्मयाच कंपन्या स्ट्रीलची निर्मिती करतात. चीनवरून होणारी आयात बंद असल्याने देशातंर्गत कंपन्यांनी स्ट्रीलचे दर वाढविले आहेत. त्याचसोबतच पिग आयर्न, निकेल, कॉपर, स्क्रॅप, सिलीका फेरो, सिलीकॉन, फेरो मॅगनिज, सँडच्या दरात दररोज वाढ होत आहे. दरवाढीवर सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे फौंड्रीचा कच्चा मालाच्या किंमती वाढल्या आहेत. जरी कच्चा मालाचे दर वाढले असले तरी त्या प्रमाणात निर्यातीचे दर वाढलेले नसल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे.

फौंड्री सोबत प्रक्रिया उद्योगांना फटका

कोईमतूर येथे देशातील सर्वांधिक फौंड्री उद्योग आहेत. सध्या हे उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. बेळगावमध्ये 50 टक्के फौंड्री उद्योग बंद होण्याच्या मार्गांवर आहे. तसेच तयार झालेल्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योगही बंद होणार आहे. यामुळे हजारो कामगार पुन्हा बेरोजगार होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने यातून तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

महादेव चौगुले (फौंड्री उद्योजक)

कोरोनाच्या प्रार्दुभावानंतर आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु कच्चा मालाचे दर वाढल्याने फौंड्री पुन्हा अडचणीत आली आहे. बेळगावमध्ये अनके उद्योग काम थांबविण्याचा तयारीत आहेत. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढणार असून फौंड्री उद्योग अनेक वर्षे मागे जाणार आहेत. त्यामुळे सरकारने दरांवर नियंत्रण आणण्याची मागणी त्यांनी केली.

Related Stories

मध्यवर्ती बसस्थानकजवळील अतिक्रमणे हटविली

Amit Kulkarni

वाळू तस्करी विरोधात तक्रार केली म्हणून पोलिसांकडून तरुणाला मारहाण

Rohan_P

लोककल्प फौंडेशनतर्फे चोर्ला येथे नेत्र तपासणी शिबिर

Amit Kulkarni

दर्शन एच. व्ही. यांच्याकडून तलाव कामाची प्रशंसा

Patil_p

प्राची गावकरला दोन सुवर्ण

Amit Kulkarni

रामदास कदम यांना जामीन

Amit Kulkarni
error: Content is protected !!