Tarun Bharat

कच्छमध्ये सलग तिसऱया भूकंप

3.5 तीव्रतेचा धक्का : भचाऊपासून 11 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातमधील कच्छमध्ये मंगळवारी सलग तिसऱया दिवशी भूकंपाचा धक्का बसला आहे. कच्छच्या भुजमध्ये मंगळवारी सकाळी 10.49 वाजता 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सोमवार आणि रविवारीही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

सोमवारी दुपारी सुमारे 1 वाजता राजकोटपासून 83 किलोमीटर अंतरावर 4.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. तर रात्री सुमारे साडेआठ वाजेपर्यंत गुजरातच्या विविध भागांमध्ये धक्के जाणवले आहेत. या कालावधीत 14 वेळा आफ्टर शॉक्स आले हेते. कच्छमध्ये रविवारी रात्री 5.3 तीव्रतेचे आणि सोमवारी 4.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले हेते. या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

19 वर्षांपूर्वी कहर

गुजरातमध्ये 26 जानेवारी 2001 रोजी 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. भुज आणि कच्छमध्ये या भूकंपामुळे प्रचंड हानी झाली होती. 10 हजार जणांना जीव गमवावा लागला होता. तर आर्थिक हानीचा आकडा हजारो कोटींमध्ये होता.

Related Stories

जगातील एक चतुर्थांश कुपोषित भारतात

Patil_p

नितीश कुमारांच्या सभेत दगडफेक

datta jadhav

सरसंघचालक भागवतांकडून दिल्लीत मशिदीला भेट, उमर अहमद इलियासी यांच्याशी बंद दाराआड चर्चा

Archana Banage

हिमाचल, उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीचा वर्षाव सुरूच

Patil_p

‘मोफत धान्य’ योजना डिसेंबरपासून बंद?

Patil_p

सारिस्का अभयारण्यातील आग विझविण्याचे प्रयत्न

Patil_p