Tarun Bharat

‘कटेंनमेंट झोन’मध्ये धान्य घरपोच देणार

नीतेश राणेंची माहितीः ‘क्वारंटाईन’ ठिकाणी पोलीस बंदोबस्त आवश्यक!

वार्ताहर / वैभववाडी:

वैभववाडीत तालुक्मयात कोरोना पॉझिटिव्ह एकूण तीन रुग्ण सापडल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याची आहे. कटेंनमेंट झोन परिसरातील नागरिकांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. या झोनमधील सुमारे चार हजार नागरिकांना घरपोच धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरविणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.

तालुक्मयातील उंबर्डे, नाधवडे व तिरवडे तर्फ सौंदळ या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार राणे यांनी येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, तहसीलदार रामदास झळके, तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, मुख्याधिकारी सुरज कांबळे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती थिटे आदी उपस्थित होते. गावागावात क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची गरज आहे. काही ठिकाणी रात्री 8 वा. नंतर क्वारंटाईन व्यक्ती गावात फिरत आहेत. त्यांना ताकीद द्या, अशी सूचना नासीर काझी यांनी केली. कटेंनमेंट झोन परिसरात पोलीस फौजफाटा वाढविण्यासंदर्भात आमदार राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याशी संपर्क साधला. गेडाम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस कर्मचारी देण्याचे मान्य केले.

दररोज किमान शंभर स्वॅब तपासणी आवश्यक

मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असून कोरोनाविषयक लक्षणे दिसून येणाऱया व्यक्तींची तात्काळ तपासणी करणे गरजेचे आहे. मिरज, कोल्हापूरहून स्वॅब रिपोर्ट तातडीने मिळण्याची संख्या खूपच कमी आहे. सिंधुदुर्गचे दररोज शंभर जणांचे स्वॅब तपासले जाऊ शकतात, अशी व्यवस्था होणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाचे राणेंकडून कौतुक

वैभववाडी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा व अन्य प्रशासन घेत असलेल्या मेहनतीचे आमदार राणे यांनी कौतुक केले. परंतु त्यांनी राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ही लढाई आपण प्रत्येकाने लढायची आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायची आहे. राज्या सरकारच्या भरोशावर कोणीही राहू नये, असे राणे यांनी सांगितले.

Related Stories

ऑनलाईन नावे असणाऱयांनाच मिळणार मोफत धान्य

Patil_p

दापोली बसस्थानकातील दुकानाला आग

Patil_p

बारावी परीक्षेवर भरारी पथकांची करडी नजर

Patil_p

आचऱ्यामधून चिपळूण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

Anuja Kudatarkar

‘त्या’ वृत्ताची ग्रा.पं.कडून दखल

NIKHIL_N

‘कोरोना’ला नक्कीच हरवू

NIKHIL_N