Tarun Bharat

कट्टर शिवसैनिक भाजपला मतदान करणार नाही; राजेश क्षीरसागर

उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली भेट

कोल्हापूर प्रतिनिधी

भाजप हा शिवसेनेचा एक नंबरच शत्रू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानणारा कट्टर शिवसैनिक कधीही भाजपला मतदान करणार नाही. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जयश्री जाधव निवडून येण्यास कोणताही अडचण नाही, अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी ग्वाही दिली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी बुधवारी राजेश क्षीरसागर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी क्षीरसागर यांना विजयासाठी आवाहन केले. क्षीरसागर यांनी भाजपचे भूत शिवसेना कधीही मनगुटीवर बसू देणार नाही. आपला विजय हा महाविकास आघाडीचा आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा असणार आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशानुसार महाविकास आघाडीबरोबर असणार आहे. तो कदापि भाजपला मतदान करणार नाही, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. यावेळी वैशाली क्षीरसागरही उपस्थित होत्या.

Related Stories

विकासकामाचे नारळ आत्ताच कसे फुटले?

Archana Banage

कोल्हापूर : आमदार प्रकाश आबिटकर धर्मसंकटात!

Archana Banage

G7 शिखर संमेलन लांबणीवर

datta jadhav

गोग्रा, डेपसांगमधील सैन्यवापसीवर भारत-चीनमध्ये चर्चा

datta jadhav

कर्नाटकमध्ये दारू खरेदीसाठीची वयोमर्यादा 18 ऐवजी 21

Abhijeet Khandekar

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना काहीही झाले तर देश पेटेल; काँग्रेस नेत्याचा इशारा

Abhijeet Khandekar