मुंबई / प्रतिनिधा
चिंताजनक रूग्णवाढ, ऑक्सिजनची कमतरता, लसींचा तुटवडा या पार्श्वभूमिवर कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी बुधवारी संवाद साधून याबाबतची घोषणा करतील, अशी माहिती बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.
यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. मंत्री शेख म्हणाले, राज्यात कठोर निर्बंधांनंतरही रूग्णसंख्या कमी होत नाही. ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा असून बेड मिळत नाहीत. वैद्यकीय सुविधा, संसाधनांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेनंतर संपूर्ण लॉक़ाऊनबाबत एकमत झाले. लवकरच त्याची नियमावली जाहीर करण्यात येईल.


next post