Tarun Bharat

कडक लॉकडाऊननंतर पुन्हा खरेदीसाठी गर्दी

बँका-एटीएमसमोर नागरिकांच्या रांगा : कोरोना नियमांचे उल्लंघन, बाजारपेठांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे चिंता

प्रतिनिधी / बेळगाव

तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सोमवारी अपेक्षेप्रमाणे बेळगावमध्ये खरेदीसाठी गर्दी झालीच. लॉकडाऊन खुले होण्याचा अवकाश पिशव्या घेऊन नागरिकांनी बाजारपेठ गाठली. खरेदीबरोबरच बँका आणि एटीएमच्या दारातही गर्दी दिसून आली.

 बेळगावकरांना चार दिवसांच्या लॉकडाऊनची आणि दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊनची सवय झाली होती. यावेळी कडक लॉकडाऊन तीन दिवसांचा झाला. आणि गुरुवारी बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्या दिवशी खरेदी झालीच होती. परंतु लॉकडाऊनचा कालावधी संपताच सोमवारी सकाळी पुन्हा बाजारपेठेत गर्दी झाली.

मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये हे चित्र आता नेहमीचेच झाले आहे. प्रशासन आणि अधिकारी यांनी वारंवार नागरिकांना कल्पना देऊनही कोणीच ऐकत नसल्याने आता प्रशासनसुद्धा वैतागले आहे. त्यांचे आरोग्य त्यांची जबाबदारी अशीच भूमिका प्रशासनाने घेतली आहे. अर्थात पोलीस मात्र शक्मयतो नागरिकांना सांगण्याचा, मास्क परिधान करण्याचा, हेल्मेट वापरण्याचा आग्रह धरत होते. कडक लॉकडाऊन काळात सुद्धा शहरात दुचाकी वाहनावरून तीन जणांनी फिरण्याचे सत्र सुरूच झाले आहे. त्याचप्रमाणे उपनगरांमध्ये मास्कचा वापर न करता लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.

शहरातील काही भागात सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेत बाजार भरतो आहे. सोमवारीसुद्धा शहरात हेच चित्र दिसून आले. बऱयाचशा एटीएम समोर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. नागरिक खरेदी करणार याचा अंदाज असल्याने विपेत्यांनीसुद्धा सकाळ उजाडण्यापूर्वीच बाजारपेठेत गर्दी केली.

Related Stories

होनगा भागात खरीप पिकांची उगवण उत्कृष्ट

Amit Kulkarni

तलवारीने हल्ला करणाऱया तिघांना अटक

Patil_p

खादरवाडी मराठा मंडळ इंग्लिश स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

Patil_p

बबन, भक्ती, मनिकांत, प्राजक्ता, मोनूकुमार, स्नेहा विजेते

Amit Kulkarni

मोदगा येथील ‘ती’ जमीन मारुती देवस्थानची

Amit Kulkarni

रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मनपाकडून मलमपट्टी

Amit Kulkarni