Tarun Bharat

कडलगेजवळ ओढयावरून तरुण गेला वाहून

कार्वे /वार्ताहर :

      ढोलगरवाडी ते कडलगे दरम्यानच्या ओढ्यावर आलेल्या पुराच्या पाण्यातून एक दुचाकी स्वार वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली. नागरदळे ता. चंदगड येथील अभिजीत संभाजी पाटील वय वर्षे 27 असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीवर पाठीमागे बसलेला शशिकांत पाटील हा केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचला.

      याबाबत असे समजते की, बुधवारी दुपारपासून या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कडलगे- ढोलगरवाडी दरम्यानच्या ओढ्यावर गुरुवारी सकाळपासूनच पाणी आले होते. कडलगे येथील पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांनी ओढ्याजवळ रस्त्यावर आडवी लाकडे टाकून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही हौशी प्रवाशांनी ही लाकडे काढून धोकादायक वाहतूक सुरू केली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अभिजीत पाटील व शशिकांत पाटील हे दोघे ढोलगरवाडी कडून नागरदळेकडे निघाले होते. पाण्यातून स्प्लेंडर एम एच 09 FU 1619 ही दुचाकी घेऊन जात असताना अंदाज चुकला व दुचाकीसह दोघेही पाण्यातून वाहून गेले. मात्र दुचाकी ओढ्याच्या बाजूला अडकल्याने व त्या दुचाकीला पकडून राहिल्याने शशिकांतला येथील उपस्थित नागरिकांनी वाचविले. मात्र अभिजीत पाण्यातून पुढे वाहून गेला. संध्याकाळपर्यंत त्याचा शोध सुरू होता. मात्र तो सापडला नाही. अभिजित हा एअर इंडियामध्ये नोकरीला होता. तो सध्या सुट्टीवर होता सुट्टी संपवून उद्याच तो ड्युटीवर हजर होणार होता असे समजते. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अशी धोकादायक वाहतूक नागरिकांनी करणे योग्य नाही हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.

Related Stories

कारखानदारांनो तुमची सुटका नाही, एफआरफी आम्ही ठरवू – राजू शेट्टी

Archana Banage

गस्त वाढवण्याबाबत पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करणार : नूतन कारागृह अधीक्षक इंदुरकर

Archana Banage

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

रिक्षा मीटर फेरफार करणाऱ्या व्यावसायिकांना योग्य सूचना द्या

Archana Banage

कोल्हापूच्या फौंड्री उद्योगाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

Archana Banage

कोडोली येथे उसाला आग; चार लाखांचे नुकसान

Archana Banage