Tarun Bharat

कडाक्याच्या भांडणात सासूचा मृत्यू

Advertisements

चिपळूण-ताम्हळमळा-पाथरवाडीतील घटना

चिपळूण

सासू व सुनेच्या झालेल्या कडाक्याच्या भांडणात सुनेने सासूला काठीने बेदम मारहाण केली. यात सासूचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री तालुक्यातील ताम्हणमळा-पाथरवाडी येथे घडली. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सुनेस ताब्यात घेत तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मानसी महेंद जडय़ाळ (28, ताम्हणमळा-पाथरवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव आहे, तर वनिता रामजी जडय़ाळ (72, ताम्हणमळा-पाथरवाडी) असे मृत्यू झालेल्या सासूचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सून मानसी व सासू वनिता या दोघींमध्ये कोणत्यातरी कारणातून शनिवारी सायंकाळी जोरदार असे कडाक्याचे भांडण झाले. याचवेळी वनिता यांचा मुलगा महेंद्र हा कामानिमित्त घराबाहेर गेला होता.

मृतावस्थेतील सासू रात्रभर घरातच पडून

हे भांडण एवढे पराकोटीला पोहोचले की, मानसीने रागाच्या भरात वनिता यांच्या डोक्यात जोरदार काठी मारून त्यांना जोरदार धक्का दिला. या धक्क्यामुळे वनिता यांचा तोल जाऊन त्या तेथील एका टेबलावर जोरात डोक्यावर आदळल्या व यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोघींमध्ये नेहमीच भांडण होत असल्याने शेजाऱयांनी त्यांच्या भांडणाकडे तितकेसे लक्ष दिले नाही. त्यामुळे सासू वनिता मृतावस्थेतच संपूर्ण रात्रभर घरातच पडून होत्या.

रविवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर ताम्हणमळा पोलीस पाटलांनी चिपळूण पोलीस स्थानकाला कळविल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद पोळ, पोलीस उपनिरीक्षक विलास पडय़ाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मानसी हिला ताब्यात घेत तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र हे भांडण नेमक्या कोणत्या कारणातून झाले, हे अद्याप स्पष्ट होत नसले तरी या बाबत तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

आता ‘रॅपिड अँटिजेन’ किटस्चा तुटवडा

NIKHIL_N

नव्याने 50 पॉझिटिव्ह, 71 कोरोनामुक्त

NIKHIL_N

दोन शाळकरी मुलींचा विष प्राशनाने मृत्यू

Omkar B

चिपळूण पूरग्रस्तांसाठी माजगावच्या कालिका प्रसाद महिला मंडळाचा मदतीचा हात

Anuja Kudatarkar

बिबटय़ाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

Patil_p

कुंभार्ली घाटाची आजपासून दुरुस्ती

Patil_p
error: Content is protected !!