प्रतिनिधी / कडेगाव
येथे मुंबई ठाणे येथून आलेल्या 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ते ठाणे येथे कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. अखेर शहरांत कोरोनाने शिरकाव केल्याने नागरिकांत भीती वातावरण असून प्रशासनाने संपूर्ण गणेशनगर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर आरोग्य विभागाने संबंधित कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील त्यांची पत्नी,मुलगा व मुलगी यांना संस्थात्मक क्वारंनटाईन केले आहे. तर तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या आता 27 वर पोहोचली आहे. मात्र कडेगाव शहराच्या आसपासच्या खेडयातील रुग्ण सापडत होते मात्र सध्या कडेगाव शहरातच पहिला रुग्ण सापडल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे.
कडेगाव शहरात सापडलेली संबंधित 56 वर्षीय कोरोना बाधीत व्यक्ती मुंबई ठाणे येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून ते मुंबई येथे एकटेच राहत होते.तर त्यांची पत्नी,मुलगा व मुलगी हे तिघे शहरांतील गणेशनगर येथे राहतात.त्यामुळे संबंधित कोरोना बाधीत व्यक्ती ही मंगळवारी (ता.30) मुंबई ठाणे येथून शासकीय परवाना काढून कडेगाव येथे आपल्या घरी कुटुंबियांकडे आले होते.याबाबत आरोग्य विभागाला माहिती मिळताच आरोग्य विभागाने त्यांना होमक्वारंनटाईन केले होते.तसेच शुक्रवारी (ता.3) त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेतले होते.त्याचा रिपोर्ट आज दुपारी दोन वाजता प्राप्त झाला असून त्यामध्ये संबंधित 56 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कडेगाव शहरातील नव्याने विकसित होणारे गणेननगत या परीसरात कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळल्याने समजताच प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डॉ.शैलजा पाटील,तालुका आरोग्य अधिकारी माधव ठाकूर,पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी तात्काळ गणेशनगर येथे भेट देऊन उपाय योजना केल्या. संपूर्ण गणेशनगर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले असून येथील सर्व रस्ते सील केले आहेत.तसेच येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तर आरोग्य विभागाने संबंधित कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील त्यांची पत्नी,मुलगा व मुलगी यांना संस्थात्मक क्वारंनटाईन केले असून त्यांना येथील एमआयडीसीतील अलगीकरण कक्षात दाखल केले आहे.तर संबंधित 56 वर्षीय कोरोनाबाधीत व्यक्तीला उपचारासाठी मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरु केले आहे.तर नगरपंचायतीच्यावतीने शहरात रोगप्रतिबंधक औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जात आहे.


previous post
next post