Tarun Bharat

कडोलीत 16 विद्युतपंपसेटची चोरी

तीन लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लांबविल्याने नागरिकांत भीती

वार्ताहर /कडोली

दुरुस्त आणि नादुरुस्त अवस्थेत असलेले सुमारे 3 लाख रुपये किमतीचे 16 विद्युतपंपसेट चोरटय़ांनी लांबविल्याची घटना रविवारी रात्री कडोली येथे घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

येथील पेठ गल्लीत मदन कल्लाप्पा संभाजी यांच्या घरासमोरील विद्युत मोटारी-पंपसेट लांबविल्याची घटना घडली आहे. मदन संभाजी हे घरासमोरील प्रांगणात पंपसेट रिपेरी करण्याचा व्यवसाय करतात. कडोली परिसरातील बहुतांशी शेतकरी या ठिकाणी रिपेरीसाठी पंपसेट घेऊन येतात. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी त्यांचा रिपेरीचा व्यवसाय सुरू असूनही चोरीचा प्रयत्न केव्हा झाला नाही. अवजड विद्युतपंपसेट कोण चोरणार नाही. पण कोणाच्या ध्यानीमनी नसताना रविवारी मध्यरात्री 25 किलोपासून 60 ते 70 किलो वजनापर्यंतच्या 16 मोटारी कोणासही थांगपत्ता न लागता अगदी शिताफीने चोरून नेल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जागेवर रिक्षासारखे वाहन आणून चोरटय़ांनी हा डाव साधला असून या चोरीच्या प्रकरणात तीन ते चार चोरांचा समावेश असण्याची शक्मयता आहे. या घटनेची काकती पोलीस ठाण्यात नोंद करूनही पोलीस घटनास्थळी फिरकलेच नाहीत.

Related Stories

सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाला अजिंक्यपद

Patil_p

पुन्हा डौलाने फडकू लागला सर्वात उंच तिरंगा

Patil_p

लवकरच 24 तास पाणी योजना ; 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर..!

Rohit Salunke

एपीएमसीमध्ये कोरोनाची धास्ती वाढली

Patil_p

गोळीबाराच्या घटनेने बेळगावात खळबळ

Patil_p

डॉक्टर पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप

Omkar B