Tarun Bharat

कडोलीत 85 टक्के मतदान

वार्ताहर / कडोली

कडोली ग्राम पंचायतीसाठी 85 टक्के मतदान झाले. केदनूर ग्राम पंचायतीत 87 टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली.

एकूण 27 जागासाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. विशेष करून या ठिकाणी काँग्रेस पुरस्कृत ग्राम विकास आघाडी आणि भाजप यांच्यातच खरी लढत पहावयास मिळाली. मतदारांना बुथवर आणण्यासाठी सर्वांचा प्रयत्न दिसत होता. कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात वॉर्ड नं. 1 मध्ये 973 पैकी 841, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 1397 पैकी 1158, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 1294 पैकी 1078, 4 मध्ये 1077 पैकी 934, 5 मध्ये 1002 पैकी 865, 6 मध्ये 1049 पैकी 898, 7 मध्ये 766 पैकी 683 तर वॉर्ड क्रं. 8 मध्ये 679 पैकी 571 मतदान झाले.

केदनूरात 87 टक्के मतदान

केदनूर ग्राम पंचायतीचे 87 टक्के विक्रमी मतदान झाले. एकूण 4150 पैकी 3601 मतदान झाले. वॉर्ड क्रं. 1 मध्ये 1305 पैकी 1090, 2 मध्ये 1395 पैकी 1230, 3 मध्ये 821 पैकी 713 तर 4 मध्ये 629 पैकी 568 मतदान झाले. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच चुरशीचे पण शांततेत पार पडले.

Related Stories

एप्रिलपासून मिळणार वाढीव रेशन

Amit Kulkarni

खरीप हंगामातील पेरणीला प्रारंभ

Patil_p

ल्युपस रोगाबाबत जागृती आवश्यक

Amit Kulkarni

‘त्या’ तरुणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Amit Kulkarni

मराठा समाज विकास निगमचे उद्या उद्घाटन

Amit Kulkarni

बेळगाव -बेंगळूर दरम्यान धावणार विशेष रेल्वे

Tousif Mujawar