Tarun Bharat

कडोली भागातील रयत संघटनेचा उद्या मोर्चा

प्रतिनिधी/ बेळगाव

शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी रोजगार हमी योजना शेती व्यवसायाला जोडावी आणि शेतकऱयांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी कडोली भागातील रयत संघटनेचा मोर्चा सोमवार दि. 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

केंद्र सरकारची रोजगार हमी योजना सर्वत्र लोकप्रिय होत असून सर्वसामान्य गरीब कुटुंबांना आधार मिळाला आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात सर्वच महिला-पुरुष कामावर जात आहेत. परिणामी शेती व्यवसायात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. तेव्हा शेती व्यवसायही बहरावा आणि सर्वसामान्य कामगारांना अधिक मजुरी मिळावी, यासाठी शेतकरी मजुरीचा काही भाग उचलण्यास तयार आहेत. तेव्हा शासनाने शेती व्यवसायाला जोड द्यावी, यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.  

Related Stories

शेतकऱयांना उच्च न्यायालयातच घ्यावी लागणार धाव

Amit Kulkarni

रस्ता ओलांडण्याची घाई, अपघाताला आमंत्रण देई!

Amit Kulkarni

चिखले धबधब्यावरील अवैध वसुली थांबवली !

Tousif Mujawar

वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा सुरळीत

Amit Kulkarni

प्लास्टिक बंदीसाठी कॅन्टोन्मेंटने उचलली पावले

Patil_p

रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिला ठार

Patil_p