Tarun Bharat

कडोली येथील शेतकऱयाचा विहिरीत पडून मृत्यू

वार्ताहर /कडोली

शेतामध्ये पिकाला पाणी सोडण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱयाचे विहिरीत पडून अपघाती निधन झाल्याची घटना रविवारी सकाळी कडोली येथे उघडकीस आली आहे.

अनिल कल्लाप्पा उचुकर (वय 48, रा. लक्ष्मी गल्ली, कडोली) असे या दुर्दैवी शेतकऱयाने नाव असून अनिल हा शेतकरी शनिवारी दुपारी कोबीज पिकाला पाणी देण्यासाठी आपल्या शेताकडे गेला होता. पण तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नव्हता. सकाळी शोधाशोध केल्यानंतर रविवारी सकाळी मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे उघडकीस आले. लागलीच येथील नागरिकांनी काकती पोलीस ठाण्याला आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश आणि सहकाऱयांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शल्यचिकित्सेसाठी जिल्हा हॉस्पिटलला पाठविला.

अनिल उच्चुकर हे स्वभावाने एक चांगली व्यक्ती म्हणून परिचित असून आत्महत्यासारखे ते कोणतेही पाऊल उचलणारे नसून पाय घसरून किंवा तोल जाऊन विहिरीत पडला असावा, अशी चर्चा नागरिकांत होत होती. अनिल याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Related Stories

गवत-झुडपांच्या विळख्यात भंगीबोळ

Amit Kulkarni

कडोलीत बहुमतासाठी करावी लागणार कसरत

Patil_p

शिवजयंती महामंडळातर्फे प्रधानमंत्री रिलीफ फंडाला मदत

Patil_p

बाजारपेठेमध्ये दहा रुपयांची नाणी घेण्यास व्यापारी वर्गाकडून टाळाटाळ

Patil_p

केरुर येथे विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

Patil_p

चौथे रेल्वेगेटजवळील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा

Amit Kulkarni