कडोली : कडोली परिसरात सुगी धांदल असतानाच ढगाळ वातारवण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेची छाया पसरली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कडोली परिसरात भात सुगीच्या कामांना जोरदार सुरुवात झाली असून केवळ 15 ते 20 टक्के शिवारातील भात सुगी आटोपण्यात आली आहेत. रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत भात सुगी उरकण्याचा प्रयत्न होत आहे. कडोली परिसरात भाताचे उत्पादन क्षेत्र जास्त असल्याने भात सुगी लवकर आटपणे अवघड आहे. हे जाणून घेऊन यंत्राच्या सहाय्याने भातकापणी करण्याचा निर्णय शेतकऱयांनी घेतला आहे. त्यासाठी गेल्या आठ दिवसात कडोली गावात 25 ते 30 भात कापणी यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. अनेक शेतकऱयांनी शिवारात भातकापणी करून टाकली आहे. मात्र अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱयांत चिंता पसरली आहे. कापून टाकलेली भातपिके अद्याप वाळायची असून अशा अवस्थेत गोळा करणेसुद्धा अवघड आहे.


previous post
next post