Tarun Bharat

कणकवलीतील आनंद तांबे यांचा बोधी ट्री पुरस्काराने औरंगाबाद येथे गौरव

Advertisements

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी

कणकवली शहरातील परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते ओटवनांदगाव प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक आनंद तांबे यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक कामाची नोंद घेत औरंगाबाद बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनतर्फे बोधी ट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद तापडिया नाट्यगृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना 2019 सालचा हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.

या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. वाल्मिकी सरवदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक प्रा. सुनील मगरे, औरंगाबाद उपशिक्षणाधिकारी जालिंदर शेंडगे, अश्विनी लाटकर, सोमनाथ वाघमारे, डी.आर रोडगे उपस्थित होते.

तांबे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध असून शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासत नवनवीन उपक्रम राबवित असतात. समूहनृत्य व समूहगान स्पर्धेत त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या शाळेतील अनेक मुले गुणवत्ता यादीत चमकली आहेत. त्यांचे शोधनिबंध व नवोपक्रम लेखन प्रसिद्ध आहेत. एक छायाचित्रकार म्हणून त्यांनीं नावलौकिता प्राप्त केली असून त्यांच्या छायाचित्रांना पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी गवस, केंद्रप्रमुख संतोष जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिप्ती परब आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे

NIKHIL_N

१० वीच्या निकालात यंदाही सिंधुदुर्गचीच बाजी

Ganeshprasad Gogate

जिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ घटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

NIKHIL_N

वेंगुर्ले तालुका वकील संघटनेतर्फे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार

NIKHIL_N

इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुकचा निकाल 100 टक्के

Ganeshprasad Gogate

मालवण किनाऱ्यावर लाकडी भुशाद्वारे तेल तवंग नष्ट करण्याचे प्रात्यक्षिक

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!