Tarun Bharat

कणकवलीत मोफत कमळ थाळीचा शुभारंभ

पहिल्याच दिवशी 180 लाभार्थ्यांकडून लाभ : थाळींची क्षमता 200 पर्यंत वाढविली – नगराध्यक्ष

वार्ताहर / कणकवली:

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नगराध्यक्षपदाच्या मानधनातून शहरातील गरजूंना मोफत ‘कमळ थाळी’चा शुभारंभ बुधवारी येथील लक्ष्मी-विष्णू मंगल कार्यालयात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातील गरजूंना दुपारी 12 ते 2 या वेळेत नियमित 200 थाळ्य़ा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 3 मेपर्यंतच्या लॉकडाऊनपर्यंत आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून व नगराध्यक्ष नलावडे यांच्या माध्यमातून ही ‘कमळ थाळी’ सुरू ठेवण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत येथील हॉलमध्ये गरजूंना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 180 लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

प्रतिदिन दीडशे थाळय़ांचे उद्दिष्ट

थाळीत दोन मूद भात, दोन चपात्या, एक वाटी वरण / डाळ (आमटी), एक भाजी असा मेनू असणार आहेत. लॉकडाऊनमुळे कणकवली शहरात अनेक परप्रांतिय मजूर व गरजू, गरीब जनता मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब निदर्शनास आली होती. लॉकडाऊनच्या काळात कोणीही गरीब उपाशी राहू नये हा यामागील उद्देश आहे. 150 थाळ्य़ा प्रतिदिनीचे उद्दिष्ट होते. मात्र, पहिल्याच दिवशी गरजूंनी केलेली गर्दी पाहून आता प्रतिदिनी 200 थाळय़ा देण्यात येणार आहेत, असे नलावडे यांनी सांगितले.

एकावेळी 50 जणांची बैठक व्यवस्था

लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये एकावेळी 50 जणांना बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर सॅनिटायझरद्वारे हात धुण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर व पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी उपक्रमाच्या ठिकाणी भेट देत माहिती घेतली. या शुभारंभप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, सभापती दिलीप तळेकर, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, शिशीर परुळेकर, मेघा गांगण, ऍड. विराज भोसले, बंडू गांगण, किशोर राणे, अण्णा कोदे, बाळा सावंत, संदीप नलावडे, सुशील पारकर आदी उपस्थित होते.

Related Stories

सीमा सील, तरीही ‘गोवा’ दारू सिंधुदुर्गात

NIKHIL_N

शिवजयंतीचे औचित्य साधून मालवण किनारपट्टीवर १७ फेब्रुवारीला स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Anuja Kudatarkar

राजापूरात हवामान केंद्रात चोरी,पोलीस तपास सुरु

Archana Banage

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करणार

Patil_p

मागील वादळावेळी जाहीर केलेल्या मदतीचे काय?

NIKHIL_N

कोकण रेल्वेतून चाकरमान्यांचा प्रवास लोंबकळतच

Patil_p