Tarun Bharat

कणकवली रुग्णालयासमोर दुचाकी गॅरेजला आग!

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमाराला घडली घटना

कणकवली/प्रतिनिधी:-

येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर नरडवे रोड येथे साबिया गॅरेज भीषण आग लागली. या आगीची झळ बाजुला असलेल्या अन्य एका हॉटेलला बसली. तर घटनास्थळी एका लाईन मधे सुमारे २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना मध्यरात्री १ वा. सुमारास घडली आहे. न. पं. च्या अग्नीशामक बंबद्वारे आग विझवण्यात आली.


साबिया गॅरेज मागील बाजूस अज्ञाताने शेकोटी पेटवली असावी! त्याचीच झळ लागून सदर आग गॅरेजला लागली असावी, असा अंदाज उपस्थितांकडून वर्तवण्यात आला. गॅरेजमधे ज्वलनशील ऑईलसह इतर सामानासह स्क्रॅप मधील गाड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर लगतच असलेल्या हॉटेल सदगुरू’ला देखील या आगीची झळ बसली. मात्र, वेळीच उपस्थित नागरिकांनी त्यातील साहित्य बाहेर काढले. आगीची माहीती मिळताच कणकवली न. प. चा अग्निशमक दलाचा बंब दाखल झाला आणि आग विझवण्यात आली. यावेळी सुशिल तांबे, वैभव आरोलकर, श्री. फर्नांडीस, ओमकार वाळवे, न. पं. कर्माचरी श्री. जाधव, श्री. मोर्य, गणेश लाड उपस्थित होते. तर पोलीस नाईक पी. एस. पार्सेकर, मकरंद माने, होमगार्ड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सदर आगीत बॅटरी, गॅरेजचे साहित्य, दोन ऑइलचे बॅरल असे आदी साहित्य मिळून नुकसान झाल्याचे गॅरेज मालक अल्तमस शेख व शाहरूख शेख (रा. बोर्डवे) यांनी सांगितले.

Related Stories

किल्ले सिंधुदुर्गवर आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्साहात

Anuja Kudatarkar

Belgoan Election: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावला जाणार

Archana Banage

Kolhapur Breaking :नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन

Abhijeet Khandekar

मेकेदातू प्रकल्प रखडण्याचा प्रश्नच नाहीः मुख्यमंत्री येडियुरप्पा

Archana Banage

‘स्पेशल केस’ म्हणून रत्नागिरीत मेडिकल कॉलेज होणार!

Patil_p

सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास ‘शूट अ‍ॅट साईट’ची ऑर्डर?

Archana Banage