Tarun Bharat

कण्हेरमध्ये झाले आतापर्यत 54 बाधित

प्रतिनिधी/ सातारा

कण्हेर गावातला एक भाजी विक्रेता हा लॉकडाऊनच्या काळात वाई भाजी मार्केटमधून भाजीपाला आणायचा. त्याच्याकडे गाडी नसायची. तो गावातील गाडय़ा भाडय़ाने घेवून जात होता. त्याला सुरुवातीला बाधा झाली. त्याच्यासोबत तीन चालकांना बाधा झाली. नंतर त्या चालकाच्या घरातील एक महिला बचतगटाच्या बैठकीला गेली अन् सगळय़ाच महिला बाधीत झाल्या. तसेच साबळेवाडी येथील एक कंपाडर बाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आल्याने कण्हेर येथील एक वयोवृद्ध बाधित होवून मृत झाला आहे. त्यामुळे गावात आतापर्यंत 54 जण बाधित झाले असून एका रात्रीत 28 जण बाधित झाले आहेत.कण्हेर ग्रामस्थांच्यासमोर आता साखळी तोडण्याचे आव्हान असून अख्खे गाव सिल केले आहे.

लॉक डाऊनच्या काळात भाजी विकेत्यांना चांगले मार्केट आले. परंतु भाजी विक्रेत्यांकडून गावात कोरोना येत आहे हे जिहे गावाने अनुभवले आहे. तोच प्रकार कण्हेर येथे घडला आहे. कण्हेर या गावात सुद्धा एक तरुण भाजी विक्रेता वेगवेगळे मार्केटमध्ये जातो. उलाढाली करतो आणि पुन्हा गावी येतो. त्याने लॉकडाऊनमध्ये वाई भाजी मार्केटमधून भाजीपाला खरेदी केला होता. खरेदी केलेला भाजीपाला त्याने अनेक ठिकाणी विकला. त्यास कुठे कोरोनाची बाधा झाली हे समजले नाही. त्याच्याकडे स्वतःचे वाहन नसल्याने तो गावातील इतरांच्या पीकअप घेवून मार्केटला भाजीपाला आणायला जायचा. त्याच्यासोबत जे वेगवेगळया वेळेला तीन जण गेले होते. त्या तीनही चालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्रास जाणवू लागल्यावर यांनी अगोदर खाजगी दवाखान्यात जुजबी औषधे घेतल्याचे समजते. त्या तीनही चालकांच्या घरातील आणि त्या भाजी विक्रेत्याच्या घरातील कुटुंबीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. एका रात्रीत त्या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहता यांनी गावात दोन वेळा शिबिरे घेतली. त्या शिबिरांमध्ये जे जे संशयित वाटतात त्यांचे स्वाब घेतले. तर घाबरुन जावू नका, असे आवाहन वारंवार करत आहेत. तर एकजण यापूर्वी साबळेवाडी येथील एका कम्पाऊंडरच्या सानिध्यात आला होता. त्या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कण्हेरमध्ये सर्व गाव सिल करण्यात आले आहे. मात्र, या गावातून वेळेकामथीकडे जाणाऱया रस्त्यावर काही घरे आहेत. त्या घरांकडे लक्ष ठेवता येत नाही. एकच होमगार्ड असून दिला असून सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी पोलीस कर्मचारी द्यावा अशी मागणी वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहता यांनी केली आहे.

कण्हेरची स्थानिक दक्षता कमिटीचे प्रयत्न विफळ

कण्हेर या गावच्या स्थानिक दक्षता कमिटीकडून काळजी घेतली जात होती. परंतु गावातलेच बाहेरुन येणारे काही केल्या एकेत नाहीत. गावात कसेही फिरतात. बाहेरुन येतात. त्यामुळे गावात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. स्थानिक दक्षता कमिटीचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसत आहे.

Related Stories

शून्यबिंदू नामावली गृहीत धरून बदली करावी

Archana Banage

शहीद 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटींची भरपाई द्या – वरुण गांधी

Abhijeet Khandekar

सातारा : सायगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस, शेतीचे प्रचंड नुकसान

Archana Banage

कण्हेर धरणात युवक-युवतीची आत्महत्या

Patil_p

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Archana Banage

लाचखोरी प्रकरण : नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार घोषित

Tousif Mujawar