Tarun Bharat

कतारमध्ये अद्ययावत फुटबॉल स्टेडियमचे उद्घाटन

वृत्तसंस्था/ अल रेयान

2022 च्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद कतार भूषविणार आहे. या स्पर्धेसाठी कतारने अद्ययावत सुविधा असलेल्या नव्या फुटबॉल स्टेडियमचे शुक्रवारी मोठय़ा थाटात उद्घाटन केले.

कतारची राजधानी दोहाच्या पश्चिमेला 24 किलो मीटर अंतरावर असलेल्या अल रेयान येथे हे स्टेडियम बांधण्यात आले आहे. 2022 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी हे नवे स्टेडियम खास आकर्षण ठरणार आहे. या स्टेडियमची क्षमता 40,000 प्रेक्षकांची आहे. शुक्रवारी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करताना सोशल डिस्टन्स पाळण्यात आले होते. फुटबॉल स्टेडियमच्या उद्घाटन समारंभाला 20,000 शौकिंनानी उपस्थिती दर्शविली. कोरोना महामारी कालावधीत पहिल्यांदा कतारमध्ये क्रीडा शौकिनांनी या स्टेडियमच्या उद्घाटन समारंभाला मोठी गर्दी केली होती. सहा दिवसापूर्वी न्यूझीलंडमध्ये सुपर रग्बी स्पर्धेला किमान 20,000 शौकिन उपस्थित होते. शुक्रवारच्या फुटबॉल स्टेडियम उद्घाटन समारंभासाठी तिकीटे ठेवण्यात आली होती.

2022 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील या नव्या स्टेडियमवर सात सामने होणार आहेत. या स्टेडियमवर कतारमधील राष्ट्रीय एमीर चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला जाणार आहे. या नव्या स्टेडियमवरील हा पहिला सामना राहील. स्टेडियमच्या उद्घाटन समारंभाला कतारचे राज्यकर्ते एमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी तसेच फिफाचे प्रमुख इन्फन्टिनो, कतार फुटबॉल फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कतारच्या या नव्या फुटबॉल स्टेडियमचे बांधकाम भारतातील प्रख्यात लार्सन-टुब्रो कंपनीने केले आहे.

Related Stories

दक्षिण आफ्रिका महिलांची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

भारतीय महिलांचा दुसरा हॉकी सामनाही अनिर्णीत

Patil_p

माजी क्रिकेटपटू शिराज धरसी कालवश

Patil_p

टी-20 साठी हार्दिक पंडय़ा कर्णधार

Patil_p

स्पेन, पोलंड उपांत्य फेरीत

Patil_p

आला रे आला, अजिंक्य आला!

Amit Kulkarni