Tarun Bharat

कनिष्ठ महिला हॉकी संघाची विजयाने दौऱयाची सांगता

Advertisements

चिली वरिष्ठ संघावर दुसऱयांदा मात, डुंगडुंगचे 2 गोल

वृत्तसंस्था/ सांतियागो

भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने सहाव्या व शेवटच्या सामन्यात चिलीच्या वरिष्ठ महिला संघाचा पुन्हा एकदा पराभव करून दौऱयाची यशस्वी सांगता केली. भारतीय महिलांनी 2-1 अशा गोलफरकाने हा सामना जिंकून सहा सामन्यांतील पाचवा विजय नोंदवला.

आघाडीवीर ब्युटी डुंगडुंगने 6 व 26 व्या मिनिटाला भारताचे गोल नोंदवले तर यजमानांचा एकमेव गोल फ्रान्सिस्का तालाने 40 व्या मिनिटाला नोंदवला. आधीच्या सामन्यातही या कनिष्ठ संघाने चिलीच्या वरिष्ठ महिलांचा 2-0 असा पराभव केला होता. या दौऱयात भारतीय कनिष्ठ महिलांनी पाच सामने जिंकले तर एक अनिर्णीत राखला. अपराजित राहिलेला हा संघ लवकरच मायदेशी परतणार आहे.

या शेवटच्या सामन्यात प्रारंभापासूनच भारताने आक्रमणास सुरुवात करून यजमानांवर दडपण आणले आणि सहाव्या मिनिटाला पहिले यशही मिळविले. आघाडीवीर डुंगडुंगने एका अप्रतिम चालीवर हा गोल नेंदवला. दुसऱया सत्रातही वर्चस्व कायम ठेवत भारताने काही संधी निर्माण केल्या आणि त्यापैकी एकावर यशही मिळविले. 26 व्या मिनिटाला डुंगडुंगनेच पेनल्टी कॉर्नरवर हा गोल नोंदवला. दोनच मिनिटानंतर चिलीनेही एक पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारताच्या बचावफळीने त्यावर उत्तम बचाव करून त्यांची संधी वाया घालविली. तिसऱया सत्रात चिलीने भारतावर वर्चस्व राखले होते. चेंडूवर सतत ताबा ठेवत त्यांनी भारतावर दडपण आणले आणि 40 व्या मिनिटाला त्यांना त्यात यशही आले. फ्रान्सिस्का तालाने हा गोल नोंदवून भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. शेवटच्या सत्रात बरोबरी साधण्यासाठी चिलीच्या वरिष्ठ संघाने भरपूर प्रयत्न केले. पण भक्कम बचाव करीत भारताने त्यांना यश मिळू दिले नाही. एका पेनल्टी कॉर्नरवर बरोबरी साधण्याची चिलीला चांगली संधी मिळाली होती. पण भारतीय बचावफळीने भक्कम बचाव करीत त्यांना बरोबरी साधू न देता भारताचा विजय साकार केला.

Related Stories

जुलैअखेर सर्व टेबलटेनिस स्पर्धा रद्द

Patil_p

आशिया जेतेपदासाठी आज भारत-श्रीलंका आमनेसामने

Patil_p

हॅलेप, नदाल, किर्गीओस, गॅरिन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे ‘पॅकअप’!

Amit Kulkarni

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा विजयी श्रीगणेशा

Patil_p

दशकांपूर्वीचा ‘विनोद’ ऑलिम्पिक उद्घाटन संचालकांना भोवला

Amit Kulkarni
error: Content is protected !!