Tarun Bharat

कन्टेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत

मंगेश तळवणेकर बनले कोरोना योद्धा

प्रतिनिधी / ओटवणे:

कारिवडे गावात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित भाग पूर्णतः सील करण्यात आला. त्यामुळे ही गैरसोय लक्षात घेऊन माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी येथील सर्व कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळवणेकर यांनी सुरुवातीपासूनच सगळीकडे जनजागृती करत कोरोना लढाईत खारीचा वाटा उचलला. आपल्या कारिवडे गावातही सर्व कुटुंबांना मास्क व आवश्यक असलेल्यांना साबण, सॅनिटायजर व जीवनावश्यक वस्तूही देण्यात आल्या होत्या.

  तळवणेकर यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत हा खारीचा वाटा उचलत कोरोना योद्धा ठरले आहेत. गावातील गावठणवाडी परिसरात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे या भागातील लोकांना बाहेर पडणे कठीण होऊन बसले. सदर भागात सुमारे 87 कुटुंबे राहतात. ही गैरसोय लक्षात घेऊन तळवणेकर यांनी या वस्तीत जीवनावश्यक वस्तूचे वितरण करून त्यांची गैरसोय दूर केली. यावेळी माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गावकर, उपसरपंच आलेक्स गोम्स, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कारिवडेकर, विष्णू सावंत, ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत कारिवडेकर उपस्थित होते.

Related Stories

पत्नीचा खून करुन तरुणाची गळफासाने आत्महत्या

Patil_p

सावंतवाडीच्या सुपुत्राला विधानसभा अध्यक्ष पदाचा बहुमान

Anuja Kudatarkar

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Abhijeet Khandekar

रघुवीर घाट तब्बल 36 तासांनी वाहतुकीसाठी मोकळा

Patil_p

एसटीची सेवा सुरळीत, रत्नागिरीत आजपासून सुरू झाली शहर बससेवा

Archana Banage

‘हॅप्पी हाय फॉक्सिया’चा रत्नागिरीत शिरकाव

Patil_p