Tarun Bharat

कन्हैया कुमार काँग्रेसच्या वाटेवर

प्रशांत किशोरांसोबत दोनवेळा राहुल गांधींची घेतली भेट

वृत्तसंस्था /पाटणा

डाव्या पक्षांचा नेता कन्हैया कुमार लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे. कन्हैयाने दोनवेळा राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या दोन्ही भेटींदरम्यान प्रशांत किशोर उपस्थित होते हे विशेष. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी कन्हैया कुमार हे बिहारमधील काँग्रेसचे मोठे चेहरे ठरू शकतात, असे मानले जात आहे.

भाकप मुख्यालयातील स्वतःचे कार्यालय रिकामी केल्यावर कन्हैया यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली. शिस्तभंगावरून भाकपच्या हैदराबाद येथे झालेल्या बैठकीत कन्हैयाच्या विरोधात निंदा प्रस्ताव संमत करण्यात आला होता.

कन्हैयाला काँग्रेसमध्ये आणण्याची जबाबदारी जौनपूर ग्रामीणचे माजी आमदार नदीम जावेद यांना सोपविण्यात आली आहे. नदीम जावेद हे एनएसयुआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय युवा काँग्रेसचे माजी महासचिव, काँग्रेस अल्पसंख्याक शाखेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत.

बिहारमध्ये काँग्रेस कमकुवत

काँग्रेसला मागील 5 विधानसभा निवडणुकांमध्ये विशेष यश मिळाले नाही. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीत सामील असूनही काँग्रेसला केवळ 27 जागांवर यश मिळाले. काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे राजदला बिहारच्या सत्तेवर पाणी सोडावे लागल्याची टीका झाली होती.

देशविरोधी घोषणांमुळे चर्चेत

2015 मध्ये कन्हैया कुमार जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष झाला होता. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्यावर कन्हैयाचे नाव देशभरात पोहोचले होते. लोकसभा निवडणुकीत भाकपच्या वतीने कन्हैयाने बेगुसराय मतदारसंघात भाजपचे फायरब्रँड नेते गिरिराज सिंह यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. गिरिराज यांनी त्याला 4 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले होते. तर चालू वर्षी कन्हैयाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. पण भाजपसोबत आघाडी असल्याने संजदमध्ये त्याला प्रवेश मिळणे कठिण आहे.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांपार

datta jadhav

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

पंजाबमधील रुग्णांनी ओलांडला 2.45 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

आंध्रात बस अपघातात सात वऱहाडींचा मृत्यू

Patil_p

सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली

Tousif Mujawar

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादनशुल्कात वाढ

Patil_p