Tarun Bharat

कपिलेश्वर रोड परिसरात मद्यपींचा धुडगूस

रहिवासी संतप्त, सकाळी 6 पासूनच बार खुले

प्रतिनिधी/ बेळगाव

कपिलेश्वर रोड परिसरात मद्यपिंचा धुडगूस सुरू आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत बार खुले ठेवण्यात येत असल्यामुळे हे प्रकार वाढले आहेत. या मद्यपिंकडून महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकार होत आहेत. तसेच घरांच्या कटय़ावर बसून दारू ठोसतानाचे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले असून हे प्रकार बंद न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱया कपिलेश्वर मंदिरात दूरवरून भाविक येतात. परंतु याच परिसरात मद्यपिंकडून सकाळ – संध्याकाळ धुडगूस घातला जात आहे. यामुळे अनेकवेळा भाविकांनाही याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पहाटे पासूनच परिसरातील बार सुरू करण्यात येत आहेत. दारू पिऊन ब्रिजखाली धिंगाणा घालणे, भांडणे, मारामाऱया करणे, शिवीगाळ करण्यात येत आहे. यामुळे महिलांना रांगोळय़ा घालण्यासाठीच बाहेर घेणे कठिण झाले आहे.

यापूर्वी परिसरातील रहिवाशांनी बार चालकांची भेट घेवून त्यांना वेळेनुसार बार सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. तरीदेखील पहाटेपासूनच बार सुरू ठेवण्यात येत आहे. पोलिसांचा कोणताही धाक ना मद्यपिंना ना बार चालकांना. परंतु या सर्वांत स्थानिक रहिवासी नाहक त्रास सहन करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी यावर तोडगा न काढल्यास रास्तारोको करू असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

बार चालकांना विचारला जाब

समज देवूनही बार चालकांकडून पहाटेपासूनच बार ठेवण्यात येत आहे. तसेच मध्यरात्री पर्यंत रेस्टारंट सुरू ठेवण्यात येत असल्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे अखेर भांदूर गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली येथील रहिवाशांनी बार मालकांची भेट घेवून त्यांना जाब विचारला. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने संतप्त नागरीकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Related Stories

सर्वसामान्य जनतेच्या समस्या तातडीने सोडवा

Amit Kulkarni

स्वच्छता निविदेचा निर्णय जिल्हाधिकाऱयांकडे

Amit Kulkarni

सिलिंडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले

Amit Kulkarni

मध्यवर्तीचा चलो कोल्हापूर’चा नारा

Amit Kulkarni

सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स, जीजी चिटणीस संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

शास्त्रीनगर येथील कर्मचाऱयांचा सत्कार

Amit Kulkarni