Tarun Bharat

कबनुरात कोरोनाने घेतला पहिला बळी, दोन रुग्णांची भर

वार्ताहर / कबनूर

कबनूर येथील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या साठ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर गावामध्ये आणखी दोन नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. गावामध्ये आता एकूण संख्या 17 झाली आहे. कोरोनाच्या नियमानुसार बाधित मयत व्यक्ती वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कबनूर तालुका हातकणंगले येथील मनेरे मळ्यातील एका साठ वर्षीय पुरुषाला अस्ताव्यस्त वाटत असल्यामुळे त्यांना प्रथम सेवा भारती मध्ये नेण्यात आले. तिथून त्वरित आय जी एम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडेदहाच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला सोमवारी सकाळी कोविड-19 च्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने रीतसर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांना संजय घोडावत अलगिकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. तसेच शिवाजी कॉर्नर मधील एका पस्तीस वर्षे महिलेला स्वॅब तपासणीसाठी अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु या महिलेचा अहवाल कोरोना बाधित असल्याचेआढळून आले असून अन्य तीन अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच कोल्हापूर रोड वरील बाळासाहेब पाटील नगरातील वाचन काम करणाऱ्या एक पुरुष कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे इचलकंरजी येथील आय. जी. एम मध्ये हे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरामध्ये नव्याने दोन रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत कबनूर मध्ये एकूण संख्या 17 वर पोहोचली आहे. गावांमध्ये दिवसेंदिवस बाबाजी संख्या वाढत असून भितीचे वातावरण पसरले आहे तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने पाटील मळा शिवाजी कॉर्नर परिसर सील करण्यात येऊन त्या परिसरात निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात आले असल्याची माहिती सरपंच सुनील स्वामी व ग्राम विकास अधिकारी. बी. टी. कुंभार यांनी सांगितले.

Related Stories

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, ओबीसी आरक्षणा शिवाय राज्यातील पालिका निवडणुका होणार

Abhijeet Khandekar

भाजपमध्ये मोठी फूट पडेल म्हणून आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित – नाना पटोले

Archana Banage

सांगली : मराठा समाजाचे आरक्षण महाविकास आघाडीच्या सरदारामुळेच गेले

Archana Banage

Kolhapur; सागाची झाडे चोरणाऱ्या दोन आरोपीवर वनविभागाकडून कारवाई

Abhijeet Khandekar

२० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत; पुरोगामी शिक्षक संघटनेचे शासनास निवेदन

Archana Banage

सांगरुळ येथे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

Abhijeet Khandekar